मुंबई: सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या जीवनविद्या मिशनने कारागृहांमध्ये व्यसनमुक्तीसाठी विशेष उपक्रम राबविला. या उपक्रमाला कैद्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकूण 1133 कैद्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्या आवाहनानुसार संपूर्ण देशभर व्यसनमुक्ती अभियान राबवले जात आहे. त्याला प्रतिसाद म्हणून जीवनविद्या मिशनने महाराष्ट्रातील नऊ आनंदगृहांमध्ये हा उपक्रम आयोजित केला.
या कार्यक्रमात बंदी बांधव व भगिनींना व्यसनांचे दुष्परिणाम, व्यसन व रोग यांचा संबंध, योग्य दिनचर्या, स्वच्छता आणि आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
यांची सविस्तर माहिती देण्यात आली. कैद्यांनी खुलेपणाने आपले व्यसन कबूल करत त्यातून मुक्त होण्याची प्रतिज्ञा केली.
या उपक्रमाला कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सकारात्मक सहकार्य मिळाले. तसेच जीवनविद्या मिशनच्या GR टीमच्या भरीव योगदानामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. या कार्यक्रमाला जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री. प्रल्हाद पै यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.