मुंबई — स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होणार असून राज्यातील एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या निवडणुकांसाठी राज्यभरात १३,३५५ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेसाठी १३,७२६ कंट्रोल युनिट्स आणि २७,४५२ बॅलेट युनिट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
कार्यक्रमानुसार २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात होईल आणि सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. नगरपरिषद, नगरपंचायती आणि थेट नगराध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणी ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.
दुबार मतदारांसाठी ‘’ डबल स्टार मार्क
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार याद्यांमध्ये संभाव्य दुबार नावांसमोर () डबल स्टार चिन्ह** नोंदवण्यात येणार आहे.
अशा मतदारांना कोणत्या ठिकाणी मतदान करणार हे सांगणे बंधनकारक असेल.
एका ठिकाणी मतदान केल्यावर दुसऱ्या ठिकाणी मतदानाचा अधिकार आपोआप रद्द होणार आहे.
निवडणूक कर्मचारी संख्या
या व्यापक निवडणूक प्रक्रियेसाठी राज्यात
२८८ निवडणूक निर्णय अधिकारी,
२८८ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, आणि एकूण ६६,७७५ अधिकारी व कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.
मतदारांची संख्या (एकूण राज्य)
• पुरुष: 53,79,931
• स्त्रिया: 53,22,870
• इतर मतदार: 775
• एकूण: 1,07,03,576
जिल्हानिहाय नगरपरिषद/नगरपंचायतींची संख्या
कोकण विभाग — २७
पालघर ४, रायगड १०, रत्नागिरी ७, सिंधुदुर्ग ४, ठाणे २
नाशिक विभाग — ४९
अहिल्यानगर १२, धुळे ४, जळगाव १८, नंदुरबार ४, नाशिक ११
पुणे विभाग — ६०
कोल्हापूर १३, पुणे १७, सांगली ८, सातारा १०, सोलापूर १२
छत्रपती संभाजीनगर विभाग — ५२
छत्तीसगाव ७, बीड ६, धाराशिव ८, हिंगोली ३, जालना ३, लातूर ५, नांदेड १३, परभणी ७
अमरावती विभाग — ४५
अमरावती १२, अकोला ६, बुलढाणा ११, वाशिम ५, यवतमाळ ११
नागपूर विभाग — ५५
भंडारा ४, चंद्रपूर ११, गडचिरोली ३, गोंदिया ४, नागपूर २७, वर्धा ६
२ डिसेंबरला होणाऱ्या मतदानानंतर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून पहिल्या टप्प्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे चित्र यानंतर स्पष्ट होईल.

