महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : स्मार्ट मीटरमुळे 99% ग्राहकांचे वीजबिल वाढलेले नाही — मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर : राज्यात राबविण्यात येत असलेली वीज स्मार्ट मीटर योजना उपयुक्त ठरली असून, हे मीटर बसविण्यात आलेल्या 99 टक्के ग्राहकांचे वीजबिल वाढलेले नाही, असे अहवाल उपलब्ध असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेतील प्रश्नोत्तर तासात दिली.

या योजनेंतर्गत ग्राहकांना प्रत्येक तासाचा वीज वापराचा तपशील (रिपोर्ट) उपलब्ध होऊ शकतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आ. राजेश मोरे यांनी हा मूळ प्रश्न उपस्थित केला होता. टोरेन्ट पॉवर लिमिटेड कंपनीकडून शेतकरी व नागरिकांकडून फक्त 100 युनिट वापर असूनही 1,000 युनिटचे देयक भरण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आणि या प्रकरणी कारवाईची मागणी केली.

यावर उत्तर देताना संबंधित राज्यमंत्री यांनी, “अशी सक्ती होत असल्याचे निदर्शनास आल्यास चौकशी केली जाईल,” असे स्पष्ट केले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सदस्य भास्कर जाधव यांनी कोकणातील अनेक घरे दीर्घकाळ बंद असतात. अशा ठिकाणी महावितरणचे अधिकारी कुलपे तोडून स्मार्ट मीटर बसवत असल्याच्या तक्रारी असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणले.

या मुद्द्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ग्राहकांना पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसवू नयेत, असे स्पष्ट आदेश देण्यात येतील.”

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात