महाराष्ट्र ताज्या बातम्या

Niket Pawaskar: साहित्यिक रविप्रकाश कुलकर्णी यांनी ‘अक्षरोत्सव’ संग्रहाची केली पाहणी

उपक्रमाचे केले मुक्तकंठाने कौतुक

तळेरे: डोंबिवली येथील सुप्रसिद्ध साहित्यिक रविप्रकाश कुलकर्णी यांनी तळेरे येथील संदेशपत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या ‘अक्षरोत्सव’ या वैशिष्ट्यपूर्ण संग्रहाची पाहणी केली. या वेळी त्यांनी संग्रहातील संदेशपत्रे पाहून उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.

या प्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते व निवेदक प्रसाद घाणेकर हेही उपस्थित होते. पाहणीदरम्यान कुलकर्णी यांनी संग्रहातील असंख्य संदेशपत्रे आवर्जून वाचली, तसेच ही संकल्पना कशी सुचली आणि ती प्रत्यक्षात कशी साकारली गेली, याची सविस्तर माहिती घेतली.

रविप्रकाश कुलकर्णी गेली अनेक वर्षे ललित मासिकामध्ये ‘इथे तिथे’ हे लोकप्रिय सदर लिहित आहेत. सकाळ, सामना आणि महाराष्ट्र टाइम्स यांसारख्या वृत्तपत्रांमधूनही त्यांनी विविध लेख व सदरे लिहिली असून, ललितमधील ‘इथे तिथे’ या सदरामुळे लेखक, प्रकाशक आणि वाचक यांच्यातील दुवा अशी त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

कौतुक करतानाच कुलकर्णी यांनी या संग्रहासंदर्भात मार्गदर्शनपर सूचना देखील केल्या. यावेळी प्रसाद घाणेकर म्हणाले की, “रॉजर फेडरर हा माझा आवडता खेळाडू आहे, मात्र कधीही त्याला पत्र लिहावेसे वाटले नाही. मात्र हा संग्रह पाहताना कल्पना अत्यंत वेगळी आणि सुंदर वाटली.” संग्रहातील अनेक नामवंत साहित्यिकांची संदेशपत्रे पाहताना उपस्थितांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

या वेळी रविप्रकाश कुलकर्णी आणि प्रसाद घाणेकर यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात