महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad MIDC : महाड औद्योगिक वसाहतीतील एम्बायो कंपनीत भीषण आग

जीवितहानी टळली; औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

महाड: महाड औद्योगिक वसाहतीतील एम्बायो या बल्क ड्रग फार्मा कंपनीत गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने ही आग वेळीच आटोक्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाले आहेत.

एम्बायो कंपनीमध्ये गुरुवारी दुपारी इन्फ्लुएंसर विभागात देखभाल (मेंटेनन्स) काम सुरू होते. या दरम्यान वेल्डिंगच्या सहाय्याने नट-बोल्ट काढण्याचे काम सुरू असताना सायंकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास वेल्डिंगच्या ठिणग्यांचा ड्राफ्ट खाली पडून खाली सांडलेल्या रसायनांना अचानक आग लागली, अशी प्राथमिक माहिती आहे.

आगीमुळे प्रचंड धुराचे लोट आणि ज्वाळा उसळल्याने संपूर्ण औद्योगिक वसाहत परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. आजूबाजूच्या कंपन्यांतील कामगारांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र कंपनीतील अंतर्गत अग्निसुरक्षा यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करण्यात आल्याने आगीवर प्राथमिक नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच औद्योगिक वसाहत अग्निशमन दल आणि महाड नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाची एकूण चार बंबांसह पथके घटनास्थळी दाखल झाली. संयुक्त प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले.

या घटनेत सुदीप देबनाथ आणि शंतनु हे दोन कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती कंपनीचे उत्पादन व्यवस्थापक सुभाष काटे यांनी दिली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता औद्योगिक सुरक्षेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

सुरक्षा नियमांबाबत चर्चा

कंपनी प्रशासनाकडून आग किरकोळ असल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात आगीचे धुराचे लोट दूरवरून स्पष्ट दिसत होते, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्येही भीती पसरली होती. रासायनिक उद्योगात वेल्डिंगसारखी कामे करताना अत्यंत कठोर सुरक्षानियमांचे पालन अपेक्षित असते. या घटनेनंतर औद्योगिक वसाहत परिसरातील कामगारांमध्ये सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी झाली होती का, याबाबत चर्चा सुरू आहे.

या आगीच्या कारणांची सखोल चौकशी होणे आवश्यक असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात