Several stray dogs kept inside a temporary cage at Raigad Fort during security arrangements for the Shivrajyabhishek ceremony. महाराष्ट्र ताज्या बातम्या

शिवराज्याभिषेक सोहळ्यात रायगडावरील भटके श्वान पिंजऱ्यात; सुरक्षेच्या नावाखाली प्राण्यांच्या बंदिस्तीवर प्रश्नचिन्ह

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या २०२१ च्या दौऱ्यानंतर अशा उपाययोजनांची पुनरावृत्ती? प्रशिक्षित श्वान पकड पथकाऐवजी पशुवैद्यकीय विभागावर जबाबदारी महाड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड किल्ल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील काही भटके श्वान आणि गुरे पकडून तात्पुरत्या पिंजऱ्यात ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या उपाययोजनेवर स्थानिक ग्रामस्थ आणि काही प्राणीप्रेमींनी प्रश्न उपस्थित करत […]

Forest Department officials with seized khair wood logs and pickup vehicle after intercepting an alleged timber smuggling operation in Kashadi Ghat near Poladpur on the Mumbai-Goa Highway. महाराष्ट्र ताज्या बातम्या

कशेडी घाटात खैर लाकडांची तस्करी उघड; वन विभागाने पिकअपसह दोन आरोपींना पकडले

महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूरजवळील कशेडी घाटात खैर लाकडांची वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. या कारवाईत अंदाजे १ लाख रुपयांची खैर लाकडे आणि सुमारे ९ लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले आहे. वन विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारच्या सुमारास कशेडी घाटातील वन विभागाच्या तपासणी नाक्यावर एमएच-०८-६७९४ क्रमांकाचे पांढऱ्या रंगाचे पिकअप […]

Shiv Sena (UBT) transport wing leader Subhash More submitting a memorandum to Pen RTO officer Madhav Suryavanshi demanding action against overloaded coal transport on the Mumbai–Goa Highway. महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबई–गोवा महामार्गावरील ओव्हरलोड कोळसा वाहतुकीविरोधात इशारा; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास चक्काजाम

महाड: मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर सुरू असलेल्या ओव्हरलोड कोळसा वाहतुकीमुळे वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण रायगड जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वाहतूक सेनेने प्रशासनाला कठोर इशारा दिला आहे. येत्या आठ दिवसांत ओव्हरलोड कोळसा वाहतूक बंद न झाल्यास चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिला. या संदर्भात सुभाष मोरे यांनी पेण येथील उपप्रादेशिक […]

Highway police honouring ‘Mrutyunjay Doot’ volunteers who rescue accident victims on the Mumbai–Goa Highway at Mahad, Raigad. महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबई–गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या ‘मृत्युंजय दूतांचा’ महामार्ग पोलिसांकडून सत्कार

महाड  – मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर गेल्या अनेक वर्षांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे. अशा परिस्थितीत अपघातग्रस्तांना वेळेवर मदत करून जीव वाचविणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांचा महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलिसांकडून सत्कार करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील इंदापूर ते पोलादपूर या दरम्यानच्या महामार्गावर अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या स्वयंसेवकांना ‘मृत्युंजय दूत’ म्हणून गौरविण्यात आले. अपघात झाल्यानंतर जखमींना वाहनातून बाहेर काढणे, त्यांना तातडीने […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad : सावित्री नदीपात्रालगत केभुर्ली येथे एम-SAND प्रकल्पाजवळ अनधिकृत वाळू साठा जप्त

कारवाई कुणावर करायची? महसूल यंत्रणा संभ्रमात जिल्हा खनिकर्म विभागाने डोळ्यावर काळी पट्टी बांधल्याचा आरोप महाड: महाडजवळील सावित्री नदीपात्रालगत केभुर्ली येथे उभारण्यात येत असलेल्या एम-SAND प्रकल्पाच्या परिसरात अनधिकृत वाळूसाठा आढळून आल्याने महाड तलाठ्यांनी तो जप्त केला आहे. मात्र हा अनधिकृत उत्खनन नेमके कोणी केले, याबाबत महसूल यंत्रणेकडे कोणतेही ठोस उत्तर नसल्याने कारवाई कोणावर करायची, असा गंभीर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad MIDC : महाड औद्योगिक वसाहतीतील एम्बायो कंपनीत भीषण आग

जीवितहानी टळली; औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर महाड: महाड औद्योगिक वसाहतीतील एम्बायो या बल्क ड्रग फार्मा कंपनीत गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने ही आग वेळीच आटोक्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाले आहेत. एम्बायो कंपनीमध्ये गुरुवारी दुपारी इन्फ्लुएंसर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad : शालेय स्पर्धेदरम्यान नववीतील विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

महाड: कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आंतरशालेय स्पर्धेसाठी अलिबाग येथून आलेल्या नववीतील विद्यार्थिनीचा कार्यक्रमादरम्यान अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी महाड येथे घडली. या घटनेमुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये शोकाकुल वातावरण पसरले असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत विद्यार्थिनीचे नाव निधी समीर म्हात्रे असे असून ती कोकण एज्युकेशन सोसायटीच्या अलिबाग तालुक्यातील शहाबाज येथील […]