महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाडमध्ये शिवसेना (शिंदे गट)चे वर्चस्व

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्हीवर शिवसेनेची पकड

राष्ट्रवादी एका जागेपुरती मर्यादित

महाड: महाड तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना (शिंदे गट)चे वर्चस्व पुन्हा एकदा ठळकपणे सिद्ध झाले आहे. जिल्हा परिषदेच्या पाचही गटांमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असून, पंचायत समितीच्या दहा पैकी नऊ जागांवर शिवसेनेने निर्विवाद आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले. निकालाचे कल लक्षात येताच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक उमेदवारांनी पराभव स्वीकारत मतमोजणी केंद्रातून माघार घेतली.

जिल्हा परिषद – पाचही जागांवर शिवसेनेचा विजय

महाड तालुक्यातील जिल्हा परिषद गटांमध्ये पुढील उमेदवार विजयी झाले:
• बिरवाडी गट: मंदा भागोजी ढेबे
• खरवली गट: मनाली मनोज काळीजकर
• नडगाव तर्फे बिरवाडी गट: विकास भरत गोगावले
• दासगाव गट: मन्सूर अ. हमीद ताज
• करंजाडी गट: निलेश लक्ष्मण ताठरे

पंचायत समिती – १० पैकी ९ जागांवर शिवसेना

पंचायत समितीमध्ये शिवसेना (शिंदे गट)च्या विजयी उमेदवारांमध्ये:
वरंध – नूतन गोपाळ मोरे,
खरवली – दिव्या मनोहर रेशीम,
नडगाव तर्फे बिरवाडी – रेणुका राजेश देशमुख,
नाते – सुरेश शांताराम महाडिक,
दासगाव – प्रेरणा जितेंद्र सावंत,
करंजाडी – संदीप रमेश खिडबडे,
विन्हेरे – शकुंतला श्रीरंग माने,
अप्पर तुडील – सबिया पाचकर
यांचा समावेश आहे.
सवाने गणातील अनिल जाधव हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते.

राष्ट्रवादी-भाजप आघाडीला केवळ बिरवाडी पंचायत समिती गणामधून मयूर पुंडलिक जाधव यांच्या विजयामुळे एकमेव जागा मिळाली आहे.

चुरशीच्या लढतीतही शिवसेनेचा वरचष्मा

नडगाव तर्फे बिरवाडी जिल्हा परिषद गटात विकास भरत गोगावले यांनी सुमारे पाच हजार मतांची आघाडी घेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निलेश महाडिक यांचा पराभव केला. करंजाडी गटात निलेश ताठरे यांनी चर्चेत असलेले सोमनाथ ओझर्डे यांचा पराभव केला. या निकालामुळे महाड-पोलादपूर तालुक्यावर शिवसेना (शिंदे गट)ची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

“निवडणूक जिल्हा परिषदेची, पण गुलाल विधानसभेचा”

महाड नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी जोरदार राजकीय हालचाली झाल्या. मात्र दांडगा जनसंपर्क असलेल्या मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली. विकास गोगावले यांचा हा विजय प्रतिष्ठेचा प्रश्न मानला जात होता. निकालानंतर महाडमध्ये विधानसभा निवडणुकीप्रमाणे गुलाल उधळण्यात आला.

राष्ट्रवादी बॅकफुटवर, उद्धव ठाकरे गट स्थिर

महाड विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील उमेदवार स्नेहल माणिकराव जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्याचा अपेक्षित फायदा न झाल्याचे चित्र महाड नगर परिषद तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत दिसून आले. उलट, उद्धव ठाकरे गटाची मते तुलनेने स्थिर राहिल्याचे चित्र समोर आले असून राष्ट्रवादीसोबतची युती मतदारांना फारशी रुचली नसल्याचे संकेत या निकालातून मिळत आहेत.

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात