महाराष्ट्र ताज्या बातम्या

₹7.69 लाख कोटींचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प; ‘सामाजिक समता वर्ष’, गाडगेबाबा सर्किट आणि स्मारक प्रकल्पांची घोषणा 

मुंबई: प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासनाच्या सूत्रांवर आधारित संतुलित विकासाला चालना देणारा ₹7 लाख 69 हजार 467 कोटींच्या तरतुदीचा 2026-27 चा अर्थसंकल्प मुख्यमंत्री व अर्थमंत्री Devendra Fadnavis यांनी आज विधानसभेत सादर केला. विधानपरिषदेत हा अर्थसंकल्प अर्थराज्यमंत्री Ashish Jaiswal यांनी मांडला.

या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न ₹6 लाख 16 हजार 99 कोटी आणि महसुली खर्च ₹6 लाख 56 हजार 651 कोटी इतका अंदाजित असून ₹40 हजार 552 कोटींची तूट अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प राज्याचे दिवंगत अर्थमंत्री Ajit Pawar यांना समर्पित केल्याचे जाहीर करताना भावूक शब्दांत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी उपमुख्यमंत्री Sunetra Pawar सभागृहात उपस्थित होत्या. मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहताच सत्तारूढ सदस्यांनी “अजित पवार अमर रहे” अशा घोषणा दिल्या.

सुमारे दीड तास चाललेल्या भाषणाची सुरुवात मुख्यमंत्री फडणवीस यांनी Chhatrapati Shivaji Maharaj, Sambhaji Maharaj, Jijabai, Shahu Maharaj, B. R. Ambedkar, Ahilyabai Holkar, Savitribai Phule आणि Annabhau Sathe यांना अभिवादन करून केली.

संत Gadge Baba यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त ‘संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट’ विकसित करण्याची घोषणा करण्यात आली. तसेच ग्रामीण विकासासाठी विविध योजना एकत्र करून ‘संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी अभियान’ राबविले जाणार आहे. ‘संत गाडगेबाबा उन्नत ग्राम योजना’ अंतर्गत 75 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येतील.

याशिवाय B. R. Ambedkar यांच्या महाड (रायगड) येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले, संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून 2026-27 हे वर्ष ‘सामाजिक समता व समरसता वर्ष’ म्हणून साजरे केले जाईल आणि त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी Bal Thackeray यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा उल्लेख करत त्यांना अभिवादन केले. दादर येथील त्यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून जून 2026 पर्यंत दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच Tukaram Maharaj यांच्या देहू येथील जन्मस्थानाच्या जतन व संवर्धनासाठी विकास आराखडा तयार करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

5 Comments

  1. dutasteride tamsulosin mims

    March 6, 2026

    dutasteride tamsulosin mims

    dutasteride tamsulosin mims

  2. topiramate 25mg weight loss reviews

    March 6, 2026

    topiramate 25mg weight loss reviews

    topiramate 25mg weight loss reviews

  3. sildenafil reduced absorption

    March 6, 2026

    sildenafil reduced absorption

    sildenafil reduced absorption

  4. vardenafil medium strength

    March 6, 2026

    vardenafil medium strength

    vardenafil medium strength

  5. MatthewPof

    March 6, 2026

    Создание аккаунта на Вавада занимает меньше двух минут и требует только email или номер телефона на старте. История транзакций выгружается в CSV или PDF — удобно для личного учёта или объяснения переводов банку. Ознакомиться с разделом можно здесь: [url=https://indodarts.com]https://indodarts.com[/url] Такая полнота статистики ценна для игроков, которые ведут собственный учёт результатов на длинной дистанции.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात