महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रात मराठी सक्तीची; मराठी शिकवली नाही तर शाळेची मान्यता रद्द – दादाजी भुसे

Education Minister Dadaji Bhuse speaking in Maharashtra Assembly on Marathi language being compulsory in schools

मुंबई : महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य असून येत्या शैक्षणिक वर्षापासून या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. मराठी विषय शिकवला जात नसल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल, अशी स्पष्ट घोषणा शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत केली.

प्रश्नोत्तराच्या तासात आमदार हारुन खान यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीचा कायदा असतानाही काही शाळांमध्ये मराठी शिकवली जात नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.

यावेळी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही या विषयावर सूचना करताना सांगितले की, जर राज्यात शिक्षणात मराठी भाषा सक्तीची असेल तर शाळांमध्ये मराठी शिक्षक असणेही बंधनकारक असले पाहिजे. मराठी शिक्षकांची भरती झाली तरच शासन निर्णयाची योग्य अंमलबजावणी होत असल्याचे स्पष्ट होईल, असे त्यांनी नमूद केले.

यावर उत्तर देताना शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, १ जून २०२० च्या शासन निर्णयानुसार मराठी भाषा अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच २८ फेब्रुवारी २०२४ रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार शिक्षण उपसंचालकांना याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

ज्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही, अशी बाब निदर्शनास आल्यास त्याबाबत अहवाल घेऊन संबंधित शाळांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात