महाराष्ट्र ताज्या बातम्या

धर्मस्वातंत्र्य कायद्यामुळे बळजबरीच्या धर्मांतराला आळा; बावनकुळेंकडून उद्धव ठाकरेंचे अभिनंदन

Chandrashekhar Bawankule speaking during the Maharashtra Legislative Assembly session in Mumbai.

मुंबई – राज्यातील बळजबरीने किंवा आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतराच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या धर्मस्वातंत्र्य विधेयकामुळे अशा कृत्यांवर कठोर कारवाई होईल, असे महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांनी स्पष्ट केले.

या कायद्याचे समर्थन करणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख Uddhav Thackeray यांचे त्यांनी अभिनंदन केले.

बावनकुळे म्हणाले की, देशातील १२ राज्यांनी यापूर्वीच असा कायदा लागू केला असून महाराष्ट्रही आता त्यात सामील झाला आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी अत्यंत काळजीपूर्वक या कायद्याची मांडणी केली आहे.

यावेळी त्यांनी आमदार Jitendra Awhad यांच्यावर टीका करत, ते केवळ मतदारसंघातील विशिष्ट मतदारांना खूश करण्यासाठी राजकारण करत असल्याचा आरोप केला. महायुतीची समन्वय समिती बैठक पुढील आठवड्यात होणार असून मित्रपक्षांच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होईल, असेही त्यांनी सांगितले.

तक्रारींची प्रक्रिया पारदर्शक
आमदार Narendra Mehta यांच्याविरोधातील तक्रारीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, मंत्री म्हणून तक्रार आल्यास तिची चौकशी करण्याचे आदेश देणे ही जबाबदारी आहे. तक्रार संबंधित कार्यालयाकडे पाठवली जाते आणि त्यात कोणताही वैयक्तिक हस्तक्षेप नसतो.

ओडिशा राजकारणावर भाष्य
ओडिशातील राज्यसभा निवडणुकीचा संदर्भ देत बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान Narendra Modi यांच्या विकासकामांमुळे काँग्रेस कमकुवत झाली असून तेथील आमदारांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. मोदींच्या विकासाची लाट देशभर पसरत असल्याचा दावा त्यांनी केला.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

1 Comment

  1. Melva Trythall

    March 17, 2026

    Hi my family member! I want to say that this article is amazing, great written and come with almost all vital infos. I would like to look extra posts like this .

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात