महाराष्ट्र ताज्या बातम्या

नाशिक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण: पोलिसांची कारवाई नियोजनबद्ध – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांची कारवाई ही पूर्णतः नियोजनबद्ध होती, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली.

काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर स्थगन प्रस्तावाची सूचना मांडत कठोर कारवाईची मागणी केली. तसेच या प्रकरणात ज्या मंत्र्यांची नावे समोर आली आहेत, त्यांचे राजीनामे घ्यावेत, अशीही त्यांनी मागणी केली.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भोंदूबाबा अशोक खरात याला पकडण्यासाठी पोलिसांनी आधीच सापळा रचला होता. १० मार्च रोजी अन्य जिल्ह्यातील तक्रारीच्या आधारे कारवाईची सिद्धता करण्यात आली होती.

तपासात असेही समोर आले आहे की, अशोक खरात याने आपल्या तथाकथित ‘शक्तींचा’ वापर करून अनेक महिलांची दिशाभूल केली आणि त्यांच्याशी दुष्कृत्य केले. सुरुवातीला अनेक महिला तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हत्या. मात्र पोलिसांनी दिलेल्या विश्वासानंतर आता पीडित महिला पुढे येऊ लागल्या आहेत.

“हा विषय राजकारणाचा नाही, तर महिलांच्या स्वाभिमानाचा आहे,” असे स्पष्ट करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत आणखी तक्रारी नोंदवल्या जाण्याची शक्यता आहे.

या प्रकरणावर मंगळवार, २४ मार्च रोजी सभागृहात सविस्तर निवेदन करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात