Chief Minister Devendra Fadnavis informs the Maharashtra Legislative Assembly that the state ranked second in India in registered crimes against women, citing NCRB data during the Monsoon Session on Tuesday. महाराष्ट्र ताज्या बातम्या

महिलांवरील अत्याचारांत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर; विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

मुंबई : महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असल्याचा दावा राज्य सरकारकडून सातत्याने केला जात असतानाच, महिलांवरील अत्याचारांच्या नोंद झालेल्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये राज्यात महिलांवरील अत्याचाराचे तब्बल ७० हजार ५१५ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नाशिक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण: पोलिसांची कारवाई नियोजनबद्ध – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांची कारवाई ही पूर्णतः नियोजनबद्ध होती, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर स्थगन प्रस्तावाची सूचना मांडत कठोर कारवाईची मागणी केली. तसेच या प्रकरणात ज्या मंत्र्यांची नावे समोर आली आहेत, त्यांचे राजीनामे घ्यावेत, अशीही त्यांनी मागणी केली. यावर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाडमध्ये शरण्या दवंडे मृत्यू प्रकरणी ‘हिट अँड रन’चा गुन्हा दाखल करण्याची मागणी

न्याय मागणाऱ्या नागरिकांवर पोलीस ठाण्यासमोर लाठीहल्ला महाड: महाड–गोठे रोडवरील सव गावाच्या हद्दीत रस्त्याने चालत असलेल्या शरण्या अक्षय दवंडे (वय ८ वर्षे) या चिमुरडीला भरधाव कारने धडक देऊन पळून जाणाऱ्या वाहनचालकावर हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मृत शरण्येच्या नातेवाईक रूपाली मनोज आंग्रे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक तसेच राज्याच्या गृहसचिवांना निवेदन पाठवून ही मागणी केली आहे. महाड […]