महाराष्ट्र ताज्या बातम्या

अजित पवार अपघातप्रकरणी सखोल चौकशी; घातपात असल्यास दोषींना सोडणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस  

Devendra Fadnavis speaking in Maharashtra Legislative Assembly on Ajit Pawar accident investigation and law enforcement response

मुंबई : अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी कोणत्याही प्रकारचा घातपात झाला असल्यास दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा ठाम इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला.

अंतिम आठवडा चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणावर भावनिक आणि ठाम भूमिका मांडली.
“अजितदादा पवार हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते. गेल्या काही वर्षांत आमचे अत्यंत घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते,” असे सांगत त्यांनी या घटनेविषयी वैयक्तिक वेदना व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, अपघातानंतर एडीआर (Accidental Death Report) नोंदवला जातो आणि एडीआर व एफआयआर यामध्ये तांत्रिक फरक नसतो. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

मात्र, या घटनेवर कर्नाटकात झिरो एफआयआर नोंदवण्यात आल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत, “हे महाराष्ट्राची मानहानी करणारे आहे,” असे स्पष्ट केले.

शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या भावना समजून घेत असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले,
“ते तुमचे काका होते; पण येथे कोणाचीही भावना कमी नाही. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी केली जाईल.”

घातपाताचा संशय असल्यास कठोर कारवाईचा इशारा देताना त्यांनी स्पष्ट केले की,
“जर या अपघातामागे कुणाचा हात असेल, तर सत्य बाहेर काढण्यासाठी कोणतीही कसर ठेवली जाणार नाही.”

तसेच या संदर्भात प्राप्त झालेले पत्र केंद्र सरकारकडे पाठवून त्याचा पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात