महाराष्ट्र ताज्या बातम्या

बल्लाळेश्वर सहकारी पतपेढीला ‘अ’ वर्ग; सभासदांना १०.५० टक्के लाभांश जाहीर

Ballaleshwar Cooperative Credit Society 27th Annual General Meeting Navi Mumbai, member felicitation ceremony and board members on stage.

मुंबई : नवी मुंबईतील बल्लाळेश्वर सहकारी पतपेढीने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदवत सभासदांसाठी १०.५० टक्के लाभांश जाहीर केला असून संस्थेला ‘अ’ वर्गाचा दर्जाही प्राप्त झाला आहे.

पतपेढीची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा जुईनगर येथील बॉम्बे बंट्स सभागृहात अध्यक्ष आनंद सबाजी गावडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. सभेला उपाध्यक्ष भगवान शेटे, संचालक मंडळाचे सदस्य, तज्ज्ञ संचालक, स्थानिक सल्लागार, दैनंदिन ठेव प्रतिनिधी तसेच विविध शाखांतील मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

सभेदरम्यान संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर करण्यात आला. विविध क्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या सभासद व त्यांच्या मुलांचा सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.

अध्यक्ष आनंद गावडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संस्था शासनाच्या सर्व निकषांचे पालन करून पारदर्शक पद्धतीने कामकाज करत आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये संस्थेला ‘अ’ वर्ग प्राप्त झाला असून सभासदांना १०.५० टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय, संस्थेचे एनपीए (थकीत कर्ज) शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सध्या भाडेतत्त्वावर असलेल्या शाखांसाठी भविष्यात स्वमालकीच्या जागा खरेदी करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

सभेला साई प्रेरणा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक देवदास डोंगरे, अध्यक्ष तुकाराम मोरे, कामगार नेते मारुती विश्वासराव, अभिनेते राम काजरोळकर, ॲड. सोपान डुंबरे, ॲड. अमोल कुरळे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरव्यवस्थापक संजय घोगरे यांनी केले, तर उपस्थित सभासद आणि मान्यवरांचे आभार संचालक तथा जुन्नर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक नरेंद्र तांबोळी यांनी मानले.

योगेश त्रिवेदी

योगेश त्रिवेदी

About Author

योगेश त्रिवेदी (Yogesh Trivedi) हे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. त्यांनी सामना या प्रखर हिंदुत्ववादी आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या मराठी वृत्तपत्रात सर्वाधिक काळ पत्रकारिता केली.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात