महाराष्ट्र ताज्या बातम्या

डॉ. हेमराजभाई शाह यांच्या नावाने चार प्रतिष्ठित साहित्य पुरस्कारांचे वितरण २४ ऑगस्टला

ज्येष्ठ गुजराती साहित्यिक डॉ. हेमराजभाई शाह यांचा अधिकृत छायाचित्र.

मुंबई — महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे ज्येष्ठ गुजराती साहित्यिक डॉ. हेमराजभाई शाह यांच्या प्रेरणेने २४ ऑगस्ट २०२६ रोजी, कवी वीर नर्मद जयंती निमित्त चार प्रतिष्ठित साहित्य पुरस्कारांचे वितरण एका भव्य समारंभात करण्यात येणार आहे.

शंभरहून अधिक पुस्तकांचे लेखन करणारे डॉ. हेमराजभाई शाह यांनी गुजराती साहित्याच्या संवर्धनासाठी आयुष्य समर्पित केले आहे. त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याचा गौरव विविध माध्यमांतून झाला आहे. प्रसिद्ध लेखक किशोर व्यास यांनी त्यांच्या जीवनावर आधारित ‘कलश’ ही कादंबरी लिहिली असून ती प्रकाशित झाली आहे.

डॉ. शाह यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट प्रसिद्ध लेखिका व दिग्दर्शिका मनीषा शर्मा यांनी तयार केला असून, या चित्रपटाला नवी दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच ज्येष्ठ नाटककार वसंत मारू लिखित ‘हेमूदादा’ या गुजराती नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अनेक प्रयोग हाऊसफुल्ल झाले आहेत.

गुजराती साहित्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने डॉ. हेमराजभाई शाह यांच्या नावाने दरवर्षी चार साहित्य पुरस्कार प्रदान केले जातात. यामध्ये—

  • डॉ. हेमराजभाई शाह प्रेरित वीर नर्मद पुरस्कार – गुजराती विश्वकोशतर्फे, ₹31,000 रोख.
  • डॉ. हेमराजभाई शाह प्रेरित वीर नर्मद पुरस्कार – कुमारपाल देसाई यांच्या हस्ते प्रदान.
  • कवि दुलेराय काराणी पुरस्कार – सौराष्ट्र ट्रस्टच्या कच्छ मित्र दैनिकाचे व्यवस्थापकीय विश्वस्त हार्दिक मामणिया यांच्या माध्यमातून, ₹31,000 रोख.
  • डॉ. हेमराजभाई शाह अखंड आनंद पारितोषिक – अखंड आनंदचे पी. के. लहेरी यांच्या माध्यमातून, ₹10,000 रोख.
  • विश्वभारती–हेमराजभाई शाह संशोधन पुरस्कार – उषाबेन उपाध्याय यांच्या माध्यमातून डॉक्टरेट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ₹5,000 रोख.

या पुरस्कारांद्वारे गुजराती साहित्य, संशोधन आणि साहित्यिक परंपरेला प्रोत्साहन देण्याचा उद्देश असून, दरवर्षी कवी वीर नर्मद जयंतीच्या निमित्ताने हा गौरव सोहळा आयोजित केला जातो. आयोजकांनी साहित्यप्रेमी, संशोधक आणि रसिकांनी या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात