महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘नाट्य शुक्रवार’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखात शुभारंभ

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या नाट्य शुक्रवार उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वाच्या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित मान्यवर

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या उपक्रमाला इंडियन ऑईलचे पाठबळ; प्रायोगिक रंगभूमीसाठी हक्काचे व्यासपीठ

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या बहुचर्चित ‘नाट्य शुक्रवार’ उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखात शुभारंभ झाला. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे आणि इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागाच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन विभागाच्या जनरल मॅनेजर सुष्मिता त्रिपाठी यांच्या हस्ते या पर्वाचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई मराठी पत्रकार संघाने पत्रकारितेच्या क्षेत्राबरोबरच कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी सुरू केलेल्या ‘नाट्य शुक्रवार’ या अभिनव उपक्रमाला इंडियन ऑईलने प्रायोजित केले आहे. पहिल्या पर्वाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर दुसऱ्या पर्वाची सुरुवातही उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

यावेळी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी ‘नाट्य शुक्रवार’ उपक्रमाचे कौतुक केले. “कला आणि संस्कृती जपणाऱ्या ‘नाट्य शुक्रवार’सारख्या उपक्रमांना मुंबई महानगरपालिकेकडून काही मदत आवश्यक असल्यास पालिका त्यासाठी सदैव तयार आहे,” असे त्यांनी सांगितले. अशा सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागाच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन विभागाच्या जनरल मॅनेजर सुष्मिता त्रिपाठी यांनीही या उपक्रमाचे अभिनंदन केले. “इंडियन ऑईल सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. समाजोपयोगी तसेच कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांना पाठबळ देण्याची इंडियन ऑईलची परंपरा आहे,” असे त्या म्हणाल्या.

मुंबई मराठी पत्रकार संघाचा ‘नाट्य शुक्रवार’ हा प्रकल्प केवळ नाट्यप्रयोगांपुरता मर्यादित राहिलेला नाही. देशातील अन्य पत्रकार संघटनांनीही कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी कोणत्या प्रकारचे उपक्रम राबवावेत, यासाठी हा उपक्रम पथदर्शी ठरल्याचे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले. ‘नाट्य शुक्रवार’ समितीचे प्रमुख आणि पत्रकार संघाचे विश्वस्त देवदास मटाले म्हणाले, “नाट्य शुक्रवारमुळे प्रायोगिक रंगभूमीला मुंबईच्या मध्यवर्ती भागात कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ लाभले आहे. नव्या कलाकारांना आणि दर्जेदार प्रायोगिक नाटकांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

उद्घाटन सोहळ्याला मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विश्वस्त राही भिडे, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, कार्यकारिणी सदस्य रजनीश राणे, विनोद साळवी आणि राजू खाडे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार, संघाचे सदस्य, नाट्यकर्मी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात