Twitter : @therajkaran
मुंबई
मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) मिळावे म्हणून भाऊचा धक्का (Bhaucha Dhakka) मासळी बंदर व ससून बंदर संपूर्णपणे बुधवारी दिवसभर बंद ठेवण्यात आला. यातून आरक्षण न मिळालेल्या समाजाला आरक्षण देण्यास पाठिंबा देण्यात आले. यावेळी पाठिंब्याच्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, भाऊंचा धक्का निर्णय द न्यू फिश जेट्टी सी फुड डिलर असोशिएशन व भाऊचा धक्का सी फूड सप्लायर्स असोशिएशन व भाऊचा धक्का मच्छिमार कामगार संघटना यांनी घेतला. ४० वर्षात पहिल्यांदाच संपूर्ण धक्कावरील सर्व व्यवहार बुधवारी बंद होते. भाऊचा धक्का येथे अठरापगड जाती धर्माची लोक दैंनदिन काम करतात. जवळपास ४० हजारच्यावर कुटुंबांचे घर या व्यवसायामुळे चालत असतात. त्याची पर्वा न करता हे बंदर बंद ठेवून वरील संघटनांनी मराठा आंदोलनात सहभाग नोंदवत पाठिंबा दिला आहे.
यावेळी मुंबईमधील समन्वयक अमोल जाधवराव यांनी भाऊचा धक्का असोशियनच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आभार मानले. तसेच पुढील काळात देखील मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी व्हावे, यासाठी आवाहन केले. यावेळी मुंबई समन्वयक अमोल जाधवराव, संजय घार्गे, नंदा नवले, बालूषा माने, आकाश साळुंखे, रमेश आदाबे हे भाऊचा धक्का येथे उपस्थित होते.