मुंबई
दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. दिशा सालियन प्रकरणात राज्य सरकारने एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश दिले (SIT will be formed in Disha Salian death case government order) आहेत. परिणामी या प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एसआयटी स्थापन करणार
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात शिंदे सरकारकडून आता एसटीआयटीने तपास केला जाणार आङे. आज मंगळवारी 12 डिसेंबर रोजी राज्य सरकारने पोलीस दलाला एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात विरोधी पक्ष उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप आहेत.
दिशाचा मृत्यू कधी आणि कसा झाला?
9 जून 2020 रोजी सुशांत सिंहची माजी मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू कथित मुंबईच्या मालाडमधील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडल्याने झाला होता. यानंतर दिशाच्या मृत्यूला सुशांत सिंहच्या मृत्यूशीही जोडण्यात आले. दिशाच्या मृत्यूच्या पाचव्या दिवशी सुशांत सिंहचाही मृत्यू (14 जून 2020) झाला होता. अहवालानुसार, दिशाने आत्महत्या केली होती, तर काहींनुसार यामागे कट असल्याचे सांगितले जात आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी अनेकवेळा दिशा सालियन प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आहे.