महाराष्ट्र ताज्या बातम्या

धारावीचे टेंडर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातलेच! : आशिष शेलार यांचा उबाठावर पलटवार

X: @therajkaran

नागपूर: धारावीच्या पुनर्विकासाला आज जे विरोध करत आहेत, ५०० चौ. फुटाची घरे मागत आहेत, ते धारावीचं टेंडर आणि त्याच्या अटी शर्ती टीडीआरचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळातच झाला. अदानीला टेंडर देण्याची अटी शर्ती यांच्याच, त्यावेळी ५०० चौ. फुटांची घरे देण्याचा का निर्णय घेतला नाही?, असा थेट सवाल करत विधानसभा मुख्य प्रतोद आ. अँड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत ‘मुंबईमध्ये एकच चर्चा धारावीच्या पुनर्विकासातून निकालो मातोश्री २ का खर्चा’ अशा शब्दांत जोरदार पलटवार केला.

विधानसभेत आज विरोधी पक्षातर्फे नियम २९३ नुसार राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेत सहभागी होताना हा प्रस्ताव मांडणारे दगाबाज असून त्यांना आज महायुतीच्या सरकारला हे प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकारच नाही, असे सांगत विरोधकांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याचा समाचार घेत जे प्रश्न त्यांनी सोडवले नाहीत, उलट विकासाचे अनेक प्रकल्प अडवले आणि उलट्या बोंबा मारत आहेत, हे दगाबाज आहेत, असा आरोप आशिष शेलार यांनी केला.

मुंबईत कोणताही विकास प्रकल्प सुरू झाला की उबाठाकडून विरोध केला जातो. मुंबईत एलईडीचे दिवे लावण्यात आले, त्याला यांनी विरोध केला. बेस्टचा महसूल वाढवण्यासाठी बेस्टवर जाहिराती लावण्याचा निर्णय झाला, त्याला यांनी विरोध केला. मेट्रो आली, त्याला विरोध केला. जुन्या एलफिस्टन आणि आताचे प्रभादेवी रेल्वे स्टेशनवरील पादचारी पूल कोसळला, त्यावेळी आम्ही विनंती करून तातडीची बाब म्हणून मिलिटरीच्या अभियांत्रिकी विभागाला बोलावून कम करण्यास विनंती केली. ११७ दिवसांत २ पूल बांधून पूर्ण झाले. पण त्यालाही यांनी विरोध केला.

मुंबई-दिल्ली कॉरीडोरला विरोध केला. सुरुवातीला मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध केला. अशा विकासाच्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणे हा यांचा धंदा आहे. प्रकल्प अडवायचे, कट कमिशन खायचे, ही यांची कार्यपद्धती आहे. धारावीच्या रहिवाशांना ५०० चौ. फुटांची घरे मिळाली पाहिजेत, ही मागणी आज करीत आहेत, पण सरकारने तसा निर्णय घेतला आणि ५०० चौ. फुटांची घर दिली, तर मग हे ६०० चौ. फुटांची का नाही असे विचारतील. ६०० चौ. फुटांची दिली, तर ७०० चौ. फुटांची का नाही, असे विचारतील. यांना फक्त प्रकल्प अडवायचे आहेत.

गेली अनेक वर्षे धारावीच्या झोपडपट्टीत खितपत पडलेल्या मुंबईकरांना पक्की घरे मिळणार, रोगराई, दुर्गंधी मध्ये अडकलेला मुंबईकर या सर्वांतून मुक्त होणार. मुंबईची ओळख बदलणार. मुंबईत उद्योग येणार आणि इथला तरुण यांना मत देणार नाही, म्हणून त्यांची माथी भडकावून धारावीच्या पुनर्विकासाला विरोध केला जातो आहे. तर एवढीच काळजी होती, तर तुम्ही टेंडर फायनल केले, त्यावेळी ५०० चौ. फुटांची घरे का दिली नाहीत, असा सवाल केला. धारावीकर हे सर्व ओळखून असून अभी नही तो कभी नही, असा विचार करतो आहे. अडवणूक, आंदोलन, कधी मोर्चा… मुंबईत मात्र उबाठाबाबत एकच चर्चा धारावीतून निकालेंगे मातोश्री २ का खर्चा? अशी चर्चा मुंबईत सुरू आहे, अशा शब्दांत त्यांनी उबाठावर जोरदार हल्लाबोल केला.

Also Read: हिंदू वसाहतीतील जागा आरक्षण बदलून मुस्लिम कब्रस्तानसाठी दिली; चौकशी होणार

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात