X : @NalavadeAnant
नागपूर
ज्यांना मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कायमचे घरी बसवले, तेच आज धारावी बचावच्या (Dharavi Bachao) नावाखाली रस्त्यावर उतरून मोर्चा काढत आहेत. असे सांगत केवळ बिल्डरांनी सांगितले म्हणून यांनी धारावी पुनर्विकासाच्या विरोधात मोर्चा (Morcha against redevelopment of Dharavi) काढला, असा खळबळजनक आरोप शिवसेना सचिव व माज़ी आमदार किरण पावसकर (Kiran Pawaskar) यांनी उबाठा नेते उद्धव ठाकरे यांच्यावर मंगळवारी येथे केला.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी धारावीतील ४० लाख लोकांना पक्की घरे मिळावीत, त्यांचे राहणीमान सुधारावे, त्यांना सुखसोई मिळाव्यात, असे स्वप्न पहिले होते. त्यासाठी १९९५ साली एसआरए योजना (SRA scheme) सुरु करण्यात आली होती. आज इतक्या वर्षानंतर सुद्धा धारावीचे नागरिक या योजनेपासून वंचित राहिले आहेत. पण आज जेव्हा त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे असे दिसताच उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांचे सहकारी पक्ष जाणून बुजून त्यामध्ये खोडा घालत आहेत आणि त्यासाठीच त्यांनी धारावी बचावच्या नावाखाली मोर्चा काढल्याचा आरोपही पावसकर यांनी केला.
मुळात यांची इच्छाच नाही कि धारावीकरांना चांगली घरे मिळावीत, त्यांचे जीवनमान उंचवावे. यांना फक्त अदानींना (Adani) किती टीडीआर (TDR) मिळणार ? त्याचे मार्केट व्हॅल्यू काय ? ते कुणाला विकणार, याकडे त्यांचे लक्ष आहे, याची चिंता त्यांना लागली आहे. कारण आम्ही इतकी वर्षे मुंबई महानगर पालिकेच्या (BMC contractor) कामांमध्ये कंत्राटदार आहोत, त्यामुळे आम्हाला सुद्धा कंत्राट मिळायला हवे, असे या बिल्डरांनी त्यांना सांगितले म्हणून यांनी धारावी पुनर्विकासाच्या विरोधात मोर्चा काढला, असाही आरोप पावसकर यांनी केला.
पावसकर पुढे म्हणाले की, आजतागायत उबाठा व त्यांच्या सहकारी पक्षांनी धारावीकरांचा वापर फक्त मतांच्या राजकारणासाठी केला. धारावीच्या विकासाच्या नावाखाली यांनी फक्त धारावीच्या नागरिकांच्या तोंडाला फक्त पाने पुसली आहेत. मला एक प्रश्न पडतो, यांनी आतापर्यंत धारावीचा विकास केला नाही, पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार धारावीचा विकास करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे तर यांच्या पोटात पोटसूळ का उठला आहे ? अशी संतप्त विचारणाही पावसकर यांनी केली.
ज्या ज्या वेळेस सरकारने मुंबईमध्ये विकासकामे करण्याचा प्रयत्न केला त्या त्या वेळेस यांनी उद्धव ठाकरेंच्या उबाठा पक्षाने त्याला विरोध करून त्याला खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे. सरकार चांगले काम करत असताना अडथळे कसे आणायचे ? कुठले सुरु असलेले काम कसे थांबवायचे ? कुठचा मालक मला कसा भेटायला येईल ? त्याच्याशी तोडपाणी कशाप्रकारे करण्यात येईल ? हेच त्यांचे प्रयत्न सुरु आहेत आणि हेच त्यांचे धंदे आहेत, असा धक्कादायक आरोप करत ही अतिशय गंभीर बाब असून आता धारावीच्या विकासावर उठलेल्या उद्धव ठाकरेंनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, काल त्यांना धारावी बचावच्या नावाने मोर्चा काढण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक गोळा करावी लागली होती. पण येणाऱ्या काळात पुढचा मोर्चा धारावीची जनता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्याच विरोधात घेऊन येईल, असा इशाराही पावसकर यांनी दिला.