पुणे
पुण्यात भाजपच्या युवा नेत्याने रेल्वेखाली उडी देत जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या भाजप युवा मोर्चा प्रदेश संपर्क सुनील धुमाळ यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे.
सुनील धुमाळ यांनी हडपसर परिसरातील साडे सतरानळी रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येसारखं भयंकर पाऊल का उचललं, याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही. त्यांच्या मृतदेहाजवळही सुसाईड नोट आढळून आलेली नाही. तरी रेल्वे पोलिसांमार्फत पुढील तपास सुरू आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केल्याने सुनील धुमाळ भाजपच्या युवा मोर्चा प्रदेश संपर्क प्रमुख म्हणून काम करीत होते. ते भाजपमध्ये सक्रिय होते.