महाराष्ट्र ताज्या बातम्या

प्रकाश आंबेडकरांच्या फॉर्म्युल्याने आघाडीचे नेते संकटात

X: @NalavadeAnant

मुंबई: येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा एकदिलाने पराभव करण्यासाठी ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने व्यवहार्य व संघर्षमुक्त असा १२+१२+१२+१२ चा नवा फॉर्म्युला महाविकास आघाडीतील प्रमुख नेते ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार आणि काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक पत्र पाठवून दिल्याने आघाडीचे हे प्रमुख नेते संकटात सापडले आहेत. 

यासंदर्भात गुरूवारी एक ट्विट करत ॲड. आंबेडकर यांनी सांगितले की, लोकसभा निवडणूका जस जशा जवळ येत जातील तस तशा महाविकास आघाडीतील ती पक्षांमधील जागावाटपाबाबत अधिक संभ्रमाचे वातावरण निर्माण होईल. त्याचा आपसूकच फायदा भाजप मित्रपक्षांना होईल. त्यामुळे जागा वाटपावरून राज्यात आज जरी कितीही गोंधळ सुरू असला तरी देशातील सर्वाधिक जागा निवडून देणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या या जागावाटपात अद्याप आघाडीत कोणताही ठोस निर्णय होताना दिसत नाही, असेही ॲड. आंबेडकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

म्हणूनच आपण दिलेला १२ चा फॉर्मुला हा केवळ मविआ किंवा इंडिया आघाडीत आपला समावेश व्हावा इतपत मर्यादित नसून अंतर्गत सर्व वाद संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने केलेला एक प्रामाणिक प्रयत्न असल्याचेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. त्याचवेळी आपल्या या म्हणण्याचा अर्थ असा नाही की आम्हाला आघाडीत यायचे आहे. मात्र जर पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेतून हटवायचे हा जर आघाडीतील सर्व नेत्यांचा प्रामाणिक हेतू असेल तर समान जागावाटप हाच त्यावर एकमेव उपाय असल्याचा पुनरुच्चारही ॲड. आंबेडकर यांनी पत्रात केला आहे. 

Also Read: पारा यांचे चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी येणार अरुणभाई गुजराथी

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात