मुंबई
आज आमदार अपात्रता प्रकरणात निकाल लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. सायंकाळी ४ वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल जाहीर करतील. दरम्यान ठाकरे गटाच्या वकिलांनी मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.
अपात्रतेबाबत काय निर्णय होणार? असा प्रश्न सर्वांना आहे मात्र आज निर्णय होणार का? असा प्रश्न मला पडतोय कारण अजूनही प्रकरणातील वकील म्हणून मला किंवा इतर वकिलांना Maharashtra Legislative Assembly सचिव यांच्याकडून इमेल आलेला नाही की राहुल नार्वेकर किती वाजता निर्णय जाहीर करणार? असा सवाल उपस्थित केला आहे. या प्रकरणात इतका उशीर का लागतोय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुढे ते असेही म्हणाले की, अपात्रतेच्या बाबतीत निकालाच्या दोनच शक्यता आहेत. एक कायदेशीर आणि दुसरी बेकायदेशीर.तरीही प्राधान्यक्रमाने पहिली शक्यता आहे की बेकायदेशीर निर्णय येईल व एकनाथ शिंदेंसह सगळ्या आमदारांना पात्र ठरवले जाईल.दुसरी शक्यता कायद्याच्या चौकटीत बसणारी आहे ती म्हणजे शिंदेंसह सगळे अपात्र ठरतील.
एकनाथ शिंदे आणि नार्वेकरांच्या भेटीमुळे शंका
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे जे या प्रकरणातील आरोपी आहेत, त्यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. यावर विरोधकांनी संताप व्यक्त केला होता. विधानसभा अध्यक्ष निकालापूर्वी अशी भेट घेऊ शकत नाही, हे घटनाबाह्य असल्याचं घटनातज्ज्ञांचं मत आहे. दरम्यान ही भेट मतदारसंघातील कामासंदर्भात असल्याचं स्पष्टीकरण नार्वेकरांनी दिलं आहे. शरद पवारांसह उद्धव ठाकरेंनी या भेटीवर आक्षेप नोंदवला होता.