ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

4 वर्षीय मुलीवर शाळेत बलात्कार प्रकरणात मनसे आक्रमक, कठोर कारवाईबाबतच्या सर्व मागण्या आयुक्तांकडून मान्य

मुंबई

मुंबईतील कांदिवली पूर्व समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला आहे. लिटील कॅप्टन्स प्री स्कूलच्या सुरक्षा रक्षकाने मुलीला चॉकलेटच्या बहाण्याने बाथरूममध्ये नेत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर मनसेच्या विद्यार्थी सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात कठोर धोरण राबवण्याची मागणी केली जात आहे.

मनसेने यासंदर्भातील पत्र अप्पर पोलीस आयुक्तांना पाठवलं आहे. यात नमूक केल्यानुसार, मुलीवर अत्याचार झाल्याचं दोन महिला शिक्षकांच्या लक्षात आलं होतं. मात्र याबाबत पोलिसांनी कळवण्याऐवजी ती बाब लपवून ठेवण्यात आली. याशिवाय पालकांच्या परवानगीशिवाय मुलीला औषध देण्यात आलं. चार वर्षांच्या चिमुकलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होत अताना दोन्ही शिक्षक व प्राचार्यांनी तिला औषध देऊन झोपवलं, असंही या पत्रकात म्हटलं आहे.

दोन्ही शिक्षकांवर भारतीय कायद्यानुसार आणि पोस्कोअंतर्गत अटक झाली पाहिजे. तिन्ही आरोपी अद्याप फरार आहेत. या तिघांना तातडीने अटक करावी. याशिवाय प्री-स्कूल, किंडरगार्डन, प्ले-ग्रूप येथे शिक्षणासाठी येणारी मुलं सुरक्षित आहे का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासाठी एखादी इमारत, घर भाड्यावर देत असताना पोलीस व्हेरिफिकेशन बरोबरच तेथे काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ओळख व तपासणी करणं बंधनकारक करायला हवं. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे सक्तीचे करावे, अशा मागण्याचं पत्रक मनसेकडून देण्यात आलं आहे.

मुंबईचे अप्पर पोलीस आयुक्त यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या.

१. पोलिसांनी FIR मध्ये कलम ३७६ (२) (I) अंतर्गत गुन्हा दखल केला आहे. मात्र, हा गुन्हा (m) अंतर्गत नोंदवण्यात यायला हवा. अप्पर पोलिस आयुक्तांनी ही मागणी मान्य केली.

२. उत्तर मुंबईतील सर्व पूर्व प्राथमिक शाळांची यादी, पाहणी करण्याची जबाबदारी तत्काळ निर्भया पथकावर सोपवण्यात येईल. निर्भया पथकातील महिला पोलिस सर्व प्री स्कूल, किंडरगार्डन, प्ले स्कूल येथे व्यक्तिशः भेट देतील.

३. सर्व प्री स्कूल, किंडरगार्डन, प्ले स्कूल येथे सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याबाबतचा आदेश लवकरात लवकर काढण्यात येईल.

४. शाळेच्या दोन शिक्षिका आणि मुख्यध्यापक हे तिघे फरार असून त्यांना अटक करण्यात कोणतीही हयगय होणार नाही.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात