मुंबई
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर आजपासून (१६ व १७ फेब्रुवारी) लोणावळा येथे आयोजित करण्यात आले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार असून प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्यासह प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत.
शुक्रवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता ध्वजारोहण होईल व त्यानंतर १० वाजता जिल्हाध्यक्ष व जिल्हा प्रभारी यांची बैठक होईल. दुपारी २ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येईल, मान्यवरांचे स्वागत व त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे स्वागतपर भाषण होईल त्यानंतर प्रभारी रमेश चेन्नीथला यांचे मार्गदर्शन होईल व दुपारी ३ वाजता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या हस्ते उद्घाटन व मार्गदर्शनपर भाषण होईल. शिबिराच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे असतील. पहिल्या सत्रात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे नेते मार्गदर्शन करतील.
दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान असतील या सत्रात सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी व वरिष्ठ पत्रकार निरंजन टकले व राजू परुळेकर मार्गदर्शन करतील. संध्याकाळी ७.३० वाजता विधानसभा व विधान परिषद सदस्यांची बैठक होईल व त्यांनतर सांस्कृतिक कार्यक्रम होईल. शनिवार दिनांक १७ फेब्रुवारी सकाळच्या सत्राचे अध्यक्ष CWC सदस्य चंद्रकांत हंडोरे असतील. पहिल्या सत्रात वरिष्ठ वकील असिम सरोदे, अशोककुमार पांडे त्यानंतर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, AICC चे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल हे मान्यवर मार्गदर्शन करतील. दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे असतील तर विधान परिषदेचे गटनेते सतेज बंटी पाटील व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर हे मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराच्या समारोप कार्यक्रमात प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिबिराचा आढावा घेतील, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे अध्यक्षीय भाषण होईल तर समारोपाचे भाषण हे प्रभारी रमेश चेन्नीथला करणार आहेत. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पुणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप करणार आहेत.