महाराष्ट्र ताज्या बातम्या

ED : पॉवरफुल कथित डिनर डिप्लोमसी; रक्ताच्या वारसासाठी दुसरा वारसच बळी ?

X: @therajkaran

मुंबई: राज्यातील आणि एकूणच देशातील राजकारण गेली काही दशके सुसंस्कृत राहिले नाही याचा प्रत्यय हल्ली पदोपदी येत आहे. कुरघोडीच्या, स्वतःसह कुटुंबाची कातडी वाचविण्याच्या आणि स्कोअर सेटल करण्याच्या या जीवघेण्या राजकारणात कोण कधी आणि कुठल्या खेळी राजकीय पटलावर खेळेल याचा काहीच नेम नाही. देशातील एका पॉवरफुल सर्वोच्च वयोवृद्ध नेत्याने, एका दुसऱ्या माजी पॉवरफुल मुख्यमंत्र्यांची डिनर डिप्लोमसी निमित्ताने घेतलेली कथित भेट यामुळेच अनेक प्रश्न उपस्थित करायला भाग पाडत आहे.

देशभरात गेली काही वर्षे केंद्रीय संस्थांच्या (central investigating agencies) माध्यमातून अनेक कारवाया केल्या जात आहेत. पूर्वापार या कारवाया केल्या जात होत्या, मात्र हल्ली सोशल मीडियाच्या जमान्यात त्या जनतेपर्यंत मीठ मसाला लावून पोहचायला लागल्याने त्यांची चर्चाही मोठ्या प्रमाणावर होत असते. नुकतीच पडलेली एका कारखान्यावरची ईडी ची धाड आणि तातडीने केलेली कित्येक एकर जमिनीसह यंत्रसामग्रीची जप्ती म्हणूनच एका राजकीय थेअरीला चर्चेस वाव देत आहे.

राज्यातील एक आजारी कारखाना (sugar factory) केवळ ५०  कोटी रुपयांत लिलावात (auction of sugar mill) खरेदी केला जातो. खरेदी करणारा तरुण हा, या वयोवृद्ध पॉवरफुल नेत्याच्याच कुटुंबातील वारस म्हणून, स्वतःला प्रोजेक्ट करणारा तरुण असतो. या तरुणाने अंतर्गत खेळीचा एक भाग म्हणून वारस म्हणून स्वतःला इस्टेब्लीश करणाऱ्या दुसऱ्या एक ज्येष्ठ सदस्याला कुटुंबातील इतर ज्येष्ठांच्या आशीर्वादाने एकटे पाडायला सुरुवात केलेली असतेच. आजारी कारखान्याच्या या खरेदीसाठी विविध संस्थाच्या माध्यमातून खेळते भांडवल उभे केले गेले असेही आरोप या खरेदी प्रकरणात होत असतात. यापूर्वी दोन वेळा केंद्रीय संस्थांनी (ED) चौकशी करून खरेदी प्रक्रिया चुकीची होती असा ठपका ठेवलेला असताना केंद्रीय संस्था आणखी एक आरोपपत्र दाखल करतात, आणि अचानक दोन क्लोजर रिपोर्ट देखील यापैकी एक संस्था सादर करते. 

पहिल्या क्लोजर रिपोर्टमध्ये वारस म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करणाऱ्या दोघांनाही क्लीन चिट मिळालेली असते. पण दोन वर्षांनी आर्थिक व्यवहार संशयास्पद वाटल्याची उपरती अचानक झाल्याने, नवा अर्ज करून याच प्रकरणाचा तपास करण्याची गरज केंद्रीय संस्थेला भासते. मात्र त्यानंतर एखाद्या वेब सिरीजला शोभतील अशा घडामोडींतून राजकीय समिकरणेच बदलतात. वारसाहक्कावर दावा ठोकणारा पूर्वीचा नेताच आपला राजकीय बळी दिला जाऊ शकतो याचा सुगावा लागल्याने, आधीच जुने घराणे सोडून, पॉवरफुल माजी मुख्यमंत्र्याशी हातमिळवणी करतो. त्यामुळे रक्ताच्या वारसाला सेफ करायचे तर जवळचा बळी  द्यावाच लागणार, गंदा है पर धंदा है, या डर्टी पॉलिटिक्सच्या नव्या अलिखित नियमाने गॉडफादरच दुसरा बळी पुढे करतोय आणि रक्ताचा वारस वाचवतोय , अश्या नाट्यमय थेअरीची चर्चा कालपासून राज्यात सुरू झाली आहे.

थोडक्यात काय तर, या सर्व घटनांवर लवकरच एखादी वेब सिरीज आली तर आश्चर्य वाटायला नको…

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात