महाराष्ट्र ताज्या बातम्या

शिउबाठा गटाला धक्का ; जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे शिवसेनेत सामिल

X: @therajkaran

मुंबई: उल्हासनगरमधील ज्येष्ठ नेते, उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशाने उद्धव ठाकरे शिवसेना गटाला जबर धक्का बसला आहे. चंद्रकांत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (उबाठा) गटाचे दुसरे ज्येष्ठ नेते धनंजय बोडारे यांचे बंधू आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चंद्रकांत बोडारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पत्नी देखील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका आहेत. यावेळी मंत्री दीपक केसरकर, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, प्रवक्ते नरेश म्हस्के, ज्येष्ठ नेते गोपाळराव लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवसेनेतील महाफुटीनंतर राज्यातील अनेक मान्यवर आणि दिग्गज नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आले. उल्हासनगरचे राजेंद्र चौधरी यांनी देखील सुरवातीला टाळाटाळ करून अखेर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला होताच. मात्र धनंजय व चंद्रकांत या बोडारे बंधूंनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडायला नकार दिला होता. अखेर चंद्रकांत यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.  लवकरच त्यांचे बंधू धनंजय आबा देखील एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करून शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती.

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात