X: @therajkaran
मुंबई: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (उबाठा) गटाचे नंदुरबारमधील विधानपरिषद आमदार आमश्या पाडवी (MLC Amsha Padvi) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी यांच्यासह आदिवासी पारधी क्रांती सेनेचे अध्यक्ष मुकेश साळुंखे आणि 10 महिला सरपंच, 48 पुरुष सरपंच, 2 जिल्हा परिषद सभापती, 2 उपजिल्हाप्रमुख, 4 पंचायत समिती सदस्य आणि एका युवासेना जिल्हाधिकारी आणि असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमश्या पाडवी यांनी आदिवासीबहुल नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात आदिवासी समाजासाठी (Tribal community) कायम संघर्ष केला, या समाजाला न्याय देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. आज त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे या भागातील नागरिकांना दिलासा देणे शक्य होणार आहे. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोनदा विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्याना यश आले नाही त्यामुळे त्यांनी विधान परिषदेचा मार्ग निवडला. मात्र त्यांच्या येण्याने या मागास आणि आदिवासीबहुल भागातील लोकांना न्याय देता येणे शक्य होईल, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, हा भाग शेतीसंपन्न आहे, कालच राज्य शासनाने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना (cotton and Soybean producers farmers) दिलासा देण्यासाठी 4 हजार कोटी रुपयांची तरतूद केली. आजवर कुणीही केल्या नाहीत एवढया उपाययोजना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी केल्या. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा (crop insurance) देणारे आपले पहिले राज्य आहे, नमो शेतकरी सन्मान योजनेद्वारे (Namo Shetkari Sanman Yojana) त्यांच्या खात्यात केंद्र सरकार प्रमाणे राज्य शासनाकडून अजून 6 हजार देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील शेतकऱ्यांना वेळोवेळी झालेले नुकसान, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस यातून दिलासा देण्यासाठी तसेच वेगवेगळ्या योजनांद्वारे 45 हजार कोटींची तरतूद केली. माता भगिनींना न्याय देण्यासाठी बचत गटांना बळ दिले, त्यांच्या भाग भांडवलात 50 हजारांनी वाढ केली. महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत दिली तसेच मुलींसाठी लेक लाडकी योजना सुरू केल्याचे सांगितले, समाजातील सर्व घटकांना न्याय दिल्याचे सांगितले.