X: @therajkaran
नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे नांदेडजवळ असलेल्या अर्धापूर तालुक्यातील देगाव कुऱ्हाडा येथे दुपारी लग्नासाठी गेले असता अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या.
एम. एच. २६-बीसी ७७७१ या गाडीतून आमदार बालाजी कल्याणकर हे लग्नाला गेले होते. त्यावेळी अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडून नुकसान केले. आमदार कल्याणकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आहेत. दोनच दिवसापूर्वी असीम सरोदे यांनी दावा केला होता की शिवसेनेतील 10 आमदारांची लवकरच घरवापसी होणार आहे, अर्थात दहा आमदार शिंदे यांची साथ सोडून पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेते परत येणार आहेत. या दहा नावात आमदार बालाजी कल्याणकर यांच्याही नावाचा उल्लेख असीम सरोदे यांनी केला होता.