महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘आरे’चा मास्टर प्लॅन तयार; ‘आरे’चा होणार कायापालट

दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी केली पाहणी

मुंबई: गोरेगाव परिसरातील आरे दुग्धवसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत ‘आरे’चा कायापालट दिसून येईल, असा विश्वास इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

मंत्री सावे यांनी आज आरे दुग्धवसाहत परिसराची पाहणी करून विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी स्थानिक आमदार मुरजी पटेल, आमदार बाळा नर, आणि आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत शिपूरकर उपस्थित होते.

आरे दुग्धवसाहतीकडे सध्या १,१६२ एकर जमीन उपलब्ध आहे, ज्यामध्ये दुग्धवसाहत, गोशाळा, तबेले, बगीचा, लॉन, पॅराग्रास, आणि वृक्षारोपण समाविष्ट आहे.

मंत्री सावे यांनी आरे परिसरातील नागरिकांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारण्याच्या आणि परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या सूचना दिल्या.

यावेळी आरेच्या सर्वांगीण विकासासाठी नेमलेल्या सल्लागार कंपनीने मास्टर प्लॅनचे सादरीकरण केले. मास्टर प्लॅननुसार, आरे दुग्धवसाहतीचा आठ टप्प्यांमध्ये विकास प्रस्तावित आहे. यामध्ये दुर्मिळ प्राणी, वन्यजीव, आणि वनस्पतींचा शोध घेणे, अत्याधुनिक गोशाळा उभारणे, बोटींग, बगीचा, कलादालन आदींचा समावेश आहे. हे करताना पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य दिले जाईल, असे मंत्री सावे यांनी सांगितले.

या भागात पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध बदल करण्याच्या सूचनाही मंत्री सावे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

आढावा बैठकीनंतर, मंत्री सावे यांनी आरे नर्सरी गट क्र. २०, गणेश तलाव, रवींद्र आर्ट गॅलरी, आरे रुग्णालय, न्यूझीलंड हॉस्टेल, छोटा काश्मीर उद्यान, आणि गट क्रमांक २ या परिसरांना भेट देऊन पाहणी केली.

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात