ताज्या बातम्या महाराष्ट्र

छगन भुजबळांचं सावित्रीबाईंना अभिवादन; पुतळ्याचा दुग्धाभिषेक करून कार्यकर्त्यांचा संताप

सातारा

आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्ताने साताऱ्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह छगन भुजबळही सावित्रीबाईं फुलेंचं अभिवादन करण्यासाठी गेले होते.

त्यांनी दर्शन घेतल्यानंतर शरद पवार गटाचे आणि मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक केला. ज्या मधुवादी विचारानं सावित्रीबाईंना त्रास दिला त्यांच्यासोबत गेल्याचा संताप यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त छगन भुजबळ हे साताऱ्यातील नायगाव येथे आले आहेत. भुजबळांनी सावित्रीबाई यांना अभिवादन केल्यानंतर कार्यकर्त्यांकडून सावित्रीबाईंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. भुजबळांच्या अभिवादनानंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी यावेळी घोषणाबाजी केली.

छगन भुजबळ यांनी सावित्रीबाईंच्या स्मारका ठिकाणी जाऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी स्मारकाठिकाणी आंदोलन केले. भुजबळांनी अभिवादन करताच, कार्यकर्त्यांनी पुतळ्याला दुग्धाभिषेक करत छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेचा निषेध केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात