X: @therajkaran
रायगड : अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातात एकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या अपघातात आमदार दळवी सुखरूप आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरूड-अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी हे शनिवारी मुरूड-नांदगाव येथील साळाव आगरदांडा रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी जात होते. यावेळी उसनी गावानजीकच्या टोलनाक्याच्या परिसरात महेंद्र दळवी यांची गाडी आणि जासीम अब्दुल रहेमान पासवारे या व्यक्तीच्या दुचाकीची धडक झाली. या अपघातात पासवारे जखमी झाले होते. यानंतर तातडीने त्यांना उपचारासाठी मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणात आमदार महिंद्र दळवी यांच्या कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात घडला तेव्हा महेंद्र दळवी कारमध्ये होते. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर दळवी यांच्या गाडीच्या एअर बॅग्जही उघडल्या गेल्या. अपघातानंतर दळवी यांनाही जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.