मुंबई ताज्या बातम्या

‘मधुमेहपूर्व स्थिती ते मधुमेह’ ह्या स्थित्यंतरावर तज्ज्ञमंडळींनी केली चर्चा

मुंबईत झाली मधुमेहपूर्व स्थिती वर पहिलीच परिषद

मधुमेहपूर्व टप्प्यातील प्रचलन व प्रतिबंधात्मक उपाय केले अधोरेखित

X: @therajkaran

मुंबई : लाइफनेस सायन्स इन्स्टिट्यूटतर्फे ‘प्री-डायबेटिस टू डायबेटिस: द ट्रॅजेक्टरी ऑफ कन्सर्न’ म्हणजेच मधुमेहपूर्व स्थिती ते मधुमेह ह्या विषयावर दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील अंधेरी (पश्चिम) येथील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात नुकतीच जगातील अशा प्रकारची ही पहिलीच परिषद पार पडली.

‘प्री-डायबेटिस (मधुमेहपूर्व स्थिती)’ ही गंभीर आरोग्यविषयक अवस्था आहे. ह्या टप्प्यात रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढलेली असते पण टाइप 2 मधुमेहाचे निदान करण्याएवढी जास्त वाढलेली नसते. इम्पेअर्ड फास्टिंग ग्लुकोजद्वारे निश्चित केल्या जाणाऱ्या मधुमेहपूर्व अवस्थेचे जागतिक प्रचलन 2021 सालात 5.8% (298 दशलक्ष) होते आणि 2045 मध्ये ते 6.5 टक्क्यांपर्यंत जाणार (414 दशलक्ष) असा अंदाज आहे.

आयसीएमआर-आयएनडीएबी ह्यांच्याद्वारे अलीकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, भारतातील सुमारे 15.4% शहरी लोकसंख्या आणि 15.2% ग्रामीण लोकसंख्या मधुमेहपूर्व स्थितीत आहे. एकंदर प्रचलन 15.3% आहे. या मोठ्या लोकसंख्येला मधुमेह होण्यापासून कसे वाचवायचे यावर या परिषदेत गंभीर आणि सविस्तर चर्चा झाली. प्रख्यात मधुमेहतज्ज्ञ पद्मश्री डॉ. व्ही. मोहन यांच्या हस्ते या परिषेदेचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी व्ही. मोहन यांनी मधुमेहपूर्व स्थितिवर अशा प्रकारची परिषद आयोजित केल्याबद्दल एलएसआयचे अभिनंदन केले आणि जगाला मधुमेहाची राजधानी होऊ देऊ नये यासाठी काय करायला हवे याचे सविस्तर विवेचन केले.

बीएमसीच्या उप आरोग्य कार्यकारी डॉ. दक्षा शहा यांनी लोकसंख्येतील मधुमेह रोखण्यासाठी बीएमसीच्या पुढाकाराची माहिती दिली. उद्घाटन सत्राला बीके बिर्ला महाविद्यालयाचे संचालक आणि बीकेबीसी आणि एमकेईएस-एनकेसीचे प्राचार्य उपस्थित होते आणि जागतिक आरोग्यासाठी एलएसआयच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. वैज्ञानिक सत्रामध्ये पद्मश्री डॉ. शशांक जोशी आणि डॉ. धीरज कपूर यांनी प्री-डायबेटिसचा प्रादुर्भाव आणि जोखीम घटकांवर उपस्थितांचे प्रबोधन केले.

डॉ. टेत्याना रॉक्स APD डेकिन युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रेलियातील वरिष्ठ संशोधन, यांनी मानसिक आरोग्य, आतड्यांतील मायक्रोबायोटा आणि प्रीडायबेटिस यांच्यातील संबंधांवर एक उत्कृष्ट माहिती दिली. फ्युचर व्हर्सिटी एज्युकेशन ग्रुप आणि लाइफनेस सायन्स इन्स्टिट्यूटचे संचालक गोपाल शर्मा यांनी माध्यमांशी चर्चा करताना सांगितले, “मधुमेहपूर्व स्थितीच्या प्रत्येक अंगाचा विचार करणे आणि ह्या टप्प्यातील रुग्णांचा टाइप 2 मधुमेहाकडे होणारा प्रवास टाळण्यासाठी उपायांची योजना करणे ही या परिषदेची कल्पना व प्राथमिक उद्दिष्ट आहे, विश्व स्वास्थ्यम-2024परिषदेचे वेगळेपण म्हणजे ह्यामध्ये 25 हून अधिक प्रख्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची, महत्त्वपूर्ण व गंभीर विषयांवर भाषणे व चर्चासत्रे झाली.

एण्डोक्रायनोलॉजिस्ट, मधुमेहतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, पोषणतज्ज्ञ, जीवनशैली प्रशिक्षक व योग तज्ज्ञांचा समावेश होता. प्री-डायबेटिस ओळखणे आणि त्यावर उपाय करणे हे केवळ मधुमेहाची सुरुवात रोखण्यासाठीच नव्हे तर दीर्घकालीन हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी गुंतागुंत होण्याचा महत्त्वपूर्ण धोका कमी करण्यासाठी देखील आवश्यक आहे. असेही त्यांनी सांगितले.

“पूर्व-मधुमेह ते मधुमेह” या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. सुवर्णा पाटील यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील अभ्यासातून आलेले निष्कर्ष सांगितले. प्रख्यात आहारतज्ञ शीतल जोशी आणि प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. नीता देशपांडे यांनी मधुमेहपूर्व स्थिती आणि आहाराबाबत माहिती दिली.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज