मुंबई
उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी अनिल देसाई लोकसभा रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून अनिल देसाईंना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे आघाडीतील काँग्रेसही या जागासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. मात्र दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ सोडण्यास ठाकरे गट तयार नसल्याचंही सांगितल जात आहे. विशेष म्हणजे आघाडीच्या वाटेवर असलेले प्रकाश आंबेडकरदेखील या मतदारसंघासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मतदारसंघातून मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाचे अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात चाचपणी करीत आहेत. या मतदारसंघातील अनेक शाखांना अनिल देसाईंनी भेटी दिल्या आहेत. अनिल देसाईंचा राज्यसभेत ठाकरे गटाचे खासदार आहेत.
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ…
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे राहुल रमेश शेवाळे ४,२३,७४३ मतं (५४.२१ टक्के) मिळवून विजयी झाले होते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना ३४.८५ टक्के मतदान म्हणजेच २,७२,३९३ मतं पडली होती. तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीला ८.०९ टक्के म्हणजे ६३,२५६ इतकं मतदान झालं होतं.