महाराष्ट्र ताज्या बातम्या

अप्रावा एनर्जीच्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपाययोजनांमुळे ईशान्य भारतातील 21,000 हून अधिक लोकांना लाभ

नवी दिल्ली: ईशान्य भारतात पर्यावरण संवर्धनासोबतच लोकांच्या जीवनमानात शाश्वत बदल घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, भारतातील अग्रगण्य इंटिग्रेटेड एनर्जी सोल्यूशन्स प्रदाता कंपनी अप्रावा एनर्जी हिने सेल्को फाउंडेशनसोबत भागीदारी केली आहे.

या भागीदारीद्वारे आसाम आणि नागालँड राज्यांतील समुदाय, आरोग्य आणि शिक्षण केंद्रांना सौरऊर्जेच्या माध्यमातून विश्वासार्ह व पर्यावरणपूरक वीज पुरवली जात आहे. या उपक्रमांमुळे 21,000 पेक्षा अधिक लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार असून, दरवर्षी सुमारे 57 टन CO₂ उत्सर्जनात घट होईल — जे सुमारे 2,580 झाडं लावण्याइतके आहे.

आसाममध्ये शाश्वत विकासाचे पाऊल

आसाममधील चिरांग जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या 27.5 किलोवॅट सौरऊर्जेवर चालणाऱ्या समुदाय केंद्रातून आरोग्य, उपजीविका, शिक्षण आणि युवकवर्गाच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. येथे सुरू असलेल्या विणकाम केंद्रामुळे स्थानिक महिला कारागिरांना कौशल्यविकास आणि स्थिर उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य आणि फिजिओथेरपी क्लिनिक, तसेच घरगुती अत्याचाराचा सामना करणाऱ्या महिलांसाठी कायदेशीर सहाय्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रातील युवक विभागात 800 हून अधिक युवकांना प्रशिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जात आहे.

शेतकरी, महिला उद्योजक आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांसाठी क्षमता-विकास कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत.
याशिवाय, 17 वनाधारित शिक्षण केंद्रांतील सुमारे 700 मुलांना स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत.

नागालँडमध्ये शिक्षण आणि सामुदायिक सक्षमीकरण

कोहिमा जिल्ह्यातील झाकमा आणि झाडिमा या गावांमध्ये 22.32 किलोवॅट सौरऊर्जेची व्यवस्था आणि इन्व्हर्टर प्रणाली बसविण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे 1,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत झाली असून, पाच ग्रामीण शाळांना डिजिटल लर्निंग टूल्ससह सुधारण्यात आले आहे. तसेच, सौरऊर्जेवर चालणाऱ्या रस्ते प्रकाशव्यवस्थेमुळे स्थानिक सुरक्षेतही वाढ झाली आहे.

अप्रावा एनर्जीची बांधिलकी

“शाश्वत समाजनिर्मिती हे आमच्या सीएसआर धोरणाचे केंद्रबिंदू आहे. ईशान्य भारतात आम्ही समाजाच्या तत्काळ आणि दीर्घकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी आमच्या उपक्रमांना अधिक बळकटी दिली आहे. हा प्रकल्प सर्व समाजघटकांचा समग्र विकास साधणारा उत्कृष्ट उदाहरण आहे. या प्रदेशात आमचा व्यवसाय विस्तारत असताना आम्ही अशा उपक्रमांद्वारे अधिकाधिक जीवनांमध्ये सकारात्मक बदल घडविण्यास कटिबद्ध आहोत.” — डॉ. प्रीयेश मोदी, प्रमुख (सीएसआर), अप्रावा एनर्जी

समुदाय गुंतवणुकीतील इतर उपक्रम

अप्रावाचा “Agri-SHE” कार्यक्रम आसाममधील 3,000 पेक्षा अधिक महिला उद्योजकांना कृषी आणि पशुपालन आधारित उपजीविकेच्या कौशल्यांचे प्रशिक्षण देत आहे. अक्षय पात्र फाउंडेशनच्या सहकार्याने, कंपनीने जोरहाट (आसाम) येथे एक केंद्रीकृत मध्यान्ह भोजन स्वयंपाकघर उभारले आहे, जे दररोज सुमारे 11,000 विद्यार्थ्यांना पौष्टिक भोजन पुरवते. तसेच, अप्रावा असममधील 15 महिला सामाजिक परिवर्तनकर्त्यांना सहाय्य करत आहे, ज्या वंचित समाजघटकांच्या उन्नतीसाठी कार्यरत आहेत.

अप्रावा एनर्जीची अन्य कामगिरी

अप्रावा सध्या आसाम, नागालँड आणि मणिपूर या राज्यांमध्ये आपली वीज प्रसारण मालमत्ता (Transmission Assets) चालवित आहे. कंपनीने अॅडव्हान्स्ड मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर (AMI) क्षेत्रात प्रवेश केला आहे आणि असममध्ये भारत सरकारच्या “रीव्हॅम्प्ड डिस्ट्रिब्यूशन सेक्टर स्कीम (RDSS)” अंतर्गत ‘गो-लाईव्ह’ दर्जा मिळवणारा देशातील पहिला स्मार्ट मीटर प्रकल्प यशस्वीरित्या राबवला आहे.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात