महाराष्ट्र ताज्या बातम्या

Ayurved : आयुर्वेद क्षेत्राचा गौरव : डॉ. मनीषा कोठेकर यांचा सन्मान 

नाशिक :नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिनच्या (NCISM) अध्यक्षपदी नियुक्त झाल्याबद्दल डॉ. मनीषा उपेंद्र कोठेकर यांचा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (Maharashtra Health Science University) यांच्यावतीने गौरव करण्यात आला. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अजय चंदनवाले यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सचिन मुंबरे, डॉ. मनिष इनामदार, डॉ. विलास वांगीकर, डॉ. विठ्ठल धडके, डॉ. राजकुमार पाटील, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. बोधिकिरण सोनकांबळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना प्रभारी कुलगुरू डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले की, डॉ. मनीषा कोठेकर (Dr Manisha Kothekar) यांची राष्ट्रीय आयोगाच्या (National Commission for Indian Systems of Medicine) अध्यक्षपदी झालेली निवड ही केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, संपूर्ण महाराष्ट्रातील आयुर्वेद (Ayurved) क्षेत्राचा आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा गौरव आहे. डॉ. कोठेकर यांचा प्रदीर्घ शैक्षणिक अनुभव आणि प्रशासकीय कौशल्य यामुळे देशातील भारतीय चिकित्सा पद्धतींना नवी दिशा मिळेल. शिक्षण प्रणालीत सुधारणा आणि संशोधनाला चालना देण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, डॉ. मनीषा कोठेकर यांची ही नियुक्ती म्हणजे गुणवत्तेचा सन्मान आहे. विद्यापीठाशी संलग्न संस्थेतून एका अनुभवी तज्ज्ञाची राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च पदावर निवड होणे, ही विद्यापीठासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. आयुर्वेद शिक्षणात काळानुरूप बदल घडवून आणणे आणि जागतिक स्तरावर भारतीय चिकित्सा पद्धतीची ओळख अधिक व्यापक करण्यासाठी त्यांचे नेतृत्व दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या शिस्तबद्ध प्रशासकीय कार्यशैलीचा लाभ संपूर्ण देशाला होईल, असेही त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखाधिकारी तसेच व्यवस्थापन परिषदेच्या सर्व सदस्यांनी डॉ. मनीषा उपेंद्र कोठेकर यांचे अभिनंदन केले. यानंतर विद्यापीठाची आजची व्यवस्थापन परिषद खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात