मुंबई: VIBGYOR High, पिंपळे सौदागर यांच्या वतीने आयोजित VIVA17 Basketball Tournament 2025 उत्साहात पार पडली. सलग सतराव्या वर्षी आयोजित या स्पर्धेत पुण्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. U-14, U-12 आणि U-10 अशा तिन्ही वयोगटांत मुला–मुलींचे सामने खेळवले गेले. U-14 गटात 14 टीम्स, U-12 गटात 11 टीम्स तर U-10 गटातही चांगला प्रतिसाद मिळाला.
U-12 बॉईज गटात सेंट मेरी स्कूलने विजेतेपद पटकावत दमदार खेळ सादर केला, तर या गटातील सर्वांची मने जिंकली ती गोविंद पोफळेने. त्याच्या उत्कृष्ट स्कोरिंग आणि खेळातील प्रभुत्वामुळे तो ‘बेस्ट प्लेयर’ म्हणून निवडला गेला. गोविंदला त्याचे स्पोर्ट्स टीचर्स अरुण चोपडे आणि विलास सुनगुडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, U-14 बॉईज विजेते VIBGYOR पिंपळे सौदागर तर U-14 गर्ल्स विजेत्या इंदिरा नॅशनल स्कूल ठरल्या.
U-12 गटात मुलींच्या विभागात सेंट मेरी A विजेते,
तर U-10 बॉईज आणि गर्ल्स या दोन्ही गटांमध्येही St. Mary’s ने विजेतेपद मिळवत आपला दबदबा कायम ठेवला.
स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी दाखवलेला खेळाडूपणा, टीमवर्क आणि शिस्त कौतुकास्पद ठरला. VIBGYOR High पिंपळे सौदागर यांच्या उत्कृष्ट आयोजनामुळे ही सतरावी स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.

