मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १२ पूल धोकादायक स्वरुपाचे असून काहींची दुरुस्ती सुरू आहे तर काहींची कामे पावसाळ्यानंतर सुरू होणार आहेत. त्यामुळे श्रीगणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीदरम्यान या पुलांवरून जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
महानगरपालिका व मुंबई पोलिसांकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व निर्देशांचे काटेकोर पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेवरील पूल: घाटकोपर, करी रोड, आर्थर रोड (चिंचपोकळी), भायखळा.
पश्चिम रेल्वेवरील पूल: मरीन लाईन्स, सँडहर्स्ट रोड (ग्रँट रोड–चर्नी रोडदरम्यान), फ्रेंच पूल, केनेडी पूल, फॉकलंड पूल (ग्रँट रोड–मुंबई सेंट्रलदरम्यान), महालक्ष्मी स्टेशन, प्रभादेवी–कॅरोल, दादर लोकमान्य टिळक पूल.
पालिका प्रशासनाने आवाहन केले आहे की या पुलांवर एकावेळी अधिक वजन होणार नाही याची दक्षता घ्यावी. पुलांवर ध्वनिक्षेपक वापरून नाचगाणी करू नयेत. पुलावर गर्दी न करता, थांबून वेळ न घालवता त्वरित पुढे सरकावे.