ताज्या बातम्या मुंबई राष्ट्रीय

महादेव अॅप प्रकरणात मोठी कारवाई, सह-संस्थापक रवी उप्पलला दुबईतून अटक

नवी दिल्ली

महादेव अॅप प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. दुबईच्या लोकल पोलिसांनी यावर कारवाई करीत मुख्य आरोपीचा सहकारी आणि अॅपचा सहसंस्थापक रवी उप्पल याला दुबईमधून अटक करण्यात आली आहे. भारतातील एजन्सी सातत्याने दुबई सरकारच्या संपर्कात होती आणि आरोपीला अटक करण्याबाबत चर्चाही केली जात होती.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, 43 वर्षीय उप्पल याला गेल्या आठवड्यातील दुबईतून अटक करण्यात आली होती. आणि ईडीचे अधिकारी त्याला भारतात पाठवण्यासाठी दुबईच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात होते. उप्पलविरोधात भारतात छत्तीसगड आणि मुंबई पोलीस तपास करीत आहेत. तर महादेव सट्टेबाज अॅपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी तपास करीत आहे. रवी महादेव अॅप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरव चंद्राकर याचा सहकारी आहे.

महादेव बुक अॅप सट्टेबाजांसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करतो. या अॅपवर भारतात बंदी आहे. मात्र इतर देशात हे अॅप सुरू आहे.

कोण आहे सौरव चंद्राकर?
सौरव चंद्राकर सुरुवातीला रायपूरमध्ये एक ज्यूस सेंटर चालवत होता. यानंतर तो सट्टेबाजीमध्ये सामील झाला. सौरभ चंद्राकर याने आपल्या लग्नात 200 कोटी रुपये खर्च केले होते. आपल्या लग्नात त्याने बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना परफॉर्म करायला बोलावलं होतं. सौरवचं लग्न दुबईत झालं होतं.सौरव आणि रवीने 5000 कोटींहून अधिक भ्रष्टाचार केल्याचा संशय आहे. मोठ्या संख्येने रोख रक्कम हवालाच्या माध्यमातून दुबईला पाठवली जाते. देशातील संस्थांना संशय आहे की, इतक्या मोठ्या प्रमाणात महादेव बुक अॅप दुबईतून चालवण्यासाठी दाऊद इब्राहिमच्या गँगने मदत केली.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे