नागपूर
आज राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा आठवा दिवस. सलीम कुत्ता प्रकरणावरुन ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत, यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले.
बडगुजर यांचा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर नितेश राणे यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. दरम्यान आमदार कैलास गोरंट्याल यांनी 1998 मध्ये सलीम कुत्ता याची हत्या झाल्याचा दावा केला आहे. यानंतर नितेश राणे यांनी आक्रमक होत सलीम कुत्ता याला जन्मठेपेची शिक्षा असून तो येरवडा कारागृहात असल्याचे सांगितले. शिवाय गोरट्यात यांनी उल्लेख केलेला तो सलीम कुत्ता नसून सलीम कुर्ला आहे, असं म्हणत विरोधकांवर धारेवर धरलं.
काही माध्यम संस्थांच्या माहितीनुसार, सलीम कुत्ता हा 2016 पासून येरवडा कारागृहाच्या अंडासेलमध्ये आहे. तेव्हापासून तो पॅरोलवर बाहेर आलेला नाही. 2016 च्या आधी तो नाशिक कारागृहात होता. तेथून तो पॅरोलवर बाहेर आला होता.