जयपूर
राजस्थानात दोन वेळा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर विराजमान झालेल्या भाजप नेत्या वसुंधरा राजे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. इतर (Who will be next CM of Rajasthan) दावेदारांना मागे सोडत वसुंधरा राजे आता 1 वर्षासाठी मुख्यमंत्री होऊ शकतात.
एबीपी न्यूजच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसुंधरा राजे यांनी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना फोन करून एक वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. राजस्थानात बहुमत मिळाल्यानंतर 7 दिवसांनंतरही भाजपाकडून मुख्यमंत्र्यांची घोषणा केलेली नाही.
वसुंधरा राजे यांनी याबाबत जेपी नड्डा यांच्याशी फोनवर बातचीत केली. एबीपीच्या वृत्तानुसार, नड्डांशी बोलताना वसुंधरा राजे यांनी एक वर्ष मुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. मात्र अद्याप या बातमीची पुष्ठी करण्यात आलेली नाही. वसुंधरा राजे दोन वेळा राजस्थानच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत. आता त्यांची ही तिसरी टर्म असेल.
गेल्या तीन दिवसांपासून चर्चेत
राजस्थानातील विधानसभा निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर रोजी घोषित करण्यात आला होता. यानंतर भाजपाने शुक्रवारी राज्यस्थानच्या मुख्यमंत्र्याच्या निवडीसाठी आमदारांच्या गटाच्या बैठकीसाठी एक केंद्रीय पर्यवेक्षकाची नियुक्ती केली होती. सोमवारी तीन पर्यवेक्षक राजस्थानातील आमदारांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर आमदारांच्या दलाची बैठक होईल. या बैठकीत बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन दिवसांपासून वसुंधरा राजे मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
भाजपकडून कोण असेल राजस्थानचा पुढील मुख्यमंत्री? अद्याप या प्रश्नाचं उत्तर समोर आलेलं नाही. सध्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत वसुंधरा राजे, दीया कुमारी, किरोडीलाल मीणा, गजेंद्र सिंह शेखावत, ओम माथूर, अश्वनी वैष्णव आणि बाब बालकनाथ यांच्या नावांचा समावेश आहे.