महाराष्ट्र ताज्या बातम्या

OBC Reservation : हैदराबाद गॅझेटला महाराष्ट्र सरकार अनुकूल, मग ओबीसींना ४२% आरक्षण देणार का? – हर्षवर्धन सपकाळ

मुंबई–राज्यातील महायुती सरकारने हैदराबाद गॅझेटच्या तरतुदी मान्य करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आदेश काढला आहे. जर सरकार खरोखर गॅझेट लागू करणार असेल, तर तेलंगणा सरकारप्रमाणे जातनिहाय जनगणना करून ओबीसींना ४२% आरक्षण देणार का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, “मराठा व ओबीसी समाजात आरक्षणावरून संघर्ष निर्माण झाला आहे. सरकार म्हणते […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Milind Deora :शिवसेना राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांच्या पत्रावरून सार्वत्रिक संताप

मुंबई –उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आझाद मैदानासह दक्षिण मुंबईतील आंदोलनांवर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे. इतकेच नव्हे, तर यापुढे मोठ्या आंदोलनांची ठिकाणे दक्षिण मुंबईऐवजी इतरत्र हलवावीत, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. देवरांनी पत्रात म्हटले आहे की, “दक्षिण मुंबई हे शासन, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Rohit Pawar : सिडकोपासून एपीएमसीपर्यंत – रोहित पवारांचा सरकारवर स्फोटक हल्लाबोल

मुंबई –राजकारणात मुद्दे सतत बदलत असले तरी गुरुवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेने एकाच वेळी अनेक विषयांवर स्फोटक आरोप करत सरकारला कोंडीत पकडले. सिडकोतील ५ हजार कोटींचा घोटाळा, नवी मुंबई एपीएमसीचा पुनर्विकास, रायगड टाऊनशीप, मराठा आंदोलन, आरक्षण आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांच्या वादग्रस्त पत्रावरून थेट […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यात ‘फार्मर कप’ उपक्रमाची अंमलबजावणी

१५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य शासन आणि पाणी फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम मुंबई : राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये ‘फार्मर कप’ उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी कृषी विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्य शासन आणि पाणी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने २०२६-२७ या वर्षात १५ हजार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ओबीसी, बारा बलुतेदार, भटके-विमुक्त, धनगर, वंजारी व मागासवर्गीय समाजाची एकजूट

राज्यात उभारणार मोठे आंदोलन – ओबीसी नेते हरिभाऊ राठोड मुंबई : हैद्राबाद गॅझेट अंमलबजावणी करण्याचा शासन निर्णय हा ओबीसी, बारा बलुतेदार आणि भटके-विमुक्त समाजावर अन्याय करणारा आहे. या जीआरमुळे मराठवाड्यातील मराठ्यांना पाठीमागच्या दाराने ओबीसी प्रवर्गात सामावून घेऊन ओबीसी समाजाचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर थेट डल्ला मारला आहे. त्यामुळे या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Maratha Reservation : “सर्वांना मान्य असणारा निर्णय आधीच का घेतला नाही?” – आमदार रोहित पवार

मुंबई– मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानंतर राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे (जीआर) मराठा समाजाचा विजय झाला असेल, तर त्याचे श्रेय पूर्णतः मनोज जरांगे पाटील आणि त्यांना साथ देणाऱ्या सामान्य मराठा समाजाचे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व सर्व सेल आणि विभागांचे प्रभारी आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी याबाबत अभिनंदन व्यक्त […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Underworld Don: तब्बल १८ वर्षांनंतर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर तुरुंगातून सुटका

मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन म्हणून ओळखला जाणारा अरुण गवळी उर्फ डॅडी याची तब्बल १८ वर्षांनंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज सायंकाळी नागपूर कारागृहाच्या मागील दरवाजातून त्याची सुटका करण्यात आली. सन २००७ मध्ये मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या घाटकोपर येथील निवासस्थानी भरदिवसा झालेल्या हत्याप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Eknath Shinde : पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा मोठा वाटा – उपमुख्यमंत्री

मुंबई – भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याच्या उद्दिष्टपूर्तीत महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अटल सेतू, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, मेट्रोचे जाळे अशा महत्वाकांक्षी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर गतिमान प्रवास करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. प्रशिक्षणाचा भाग म्हणून महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या भारतीय विदेश सेवेतील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री शिंदे यांची […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

सरकारच्या जीआरवर माजी न्यायाधीशांचा थेट गंभीर आक्षेप

मुंबई – मनोज जरांगे पाटील यांच्या पाच दिवसांच्या उपोषणानंतर सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या दबावाखाली हैद्राबाद गॅझेट लागू करण्यासाठी शासन निर्णय (जीआर) काढला. यानंतर मराठा आंदोलनकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. मात्र, माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील यांनी यावर व्यक्त केलेला दृष्टिकोन गंभीर आणि खळबळजनक ठरला आहे. कोळसे-पाटील म्हणाले, “हा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही. जीआर वाचून मी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

OBC : मराठ्यानंतर आता ओबीसींकडे सरकारचे लक्ष, मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन

मुंबई– मराठा आरक्षणानंतर राज्यात ओबीसी समाजाच्या वाढत्या नाराजीने सरकारची झोप उडवली होती. ठिकठिकाणी आंदोलने, बैठकीतील बहिष्कार, तर नेत्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय तापमान चांगलंच चढलं होतं. अखेर या दबावाला सरकारने झुकत बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला. ओबीसी समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे सत्तेतील राजकीय समीकरणांना नवं […]