महाराष्ट्र ताज्या बातम्या

संयुक्त किसान मोर्चाचा इशारा – कपासावरील आयात शुल्क तात्काळ रद्द करा, अन्यथा देशभर उभारणार तीव्र आंदोलन

नवी दिल्ली: केंद्र सरकारने 19 ऑगस्ट 2025 रोजी कपासावरील 11 टक्के आयात शुल्क आणि कृषी पायाभूत विकास उपकर (AIDC) हटविण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी संघटनांमध्ये प्रचंड नाराजी उसळली आहे. हा निर्णय 30 सप्टेंबरपर्यंत लागू राहणार असल्याचे वित्त मंत्रालयाने अधिसूचित केले असून सरकारने तो “जनहितासाठी” आवश्यक असल्याचे म्हटले आहे. परंतु संयुक्त किसान मोर्चा (SKM) ने याला थेट […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मंत्रालयातील सेवानिवृत्त अधिकारी सौ. शैलजा विजय शिंदे यांचे निधन – ६५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मंत्रालयातील गृह, कृषी आणि सामान्य प्रशासन विभागात प्रामाणिकपणे सेवा बजावून निवृत्त झालेल्या सौ. शैलजा विजय शिंदे यांचे आज पहाटे चारकोप, कांदिवली येथे दीर्घकालीन आजाराने निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या होत्या. सहकार आणि समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते विजय भास्कर शिंदे यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांची एकमेव कन्या अंकिता हिने अखेरपर्यंत आईची अहोरात्र सेवा शुश्रूषा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Vote Chori: “भाजपचे आरोप मतचोरीचा घोटाळा झाकण्यासाठीच” – इंद्रजीत चव्हाण

कराड : माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर केलेले दुबार मतदार नोंदणीचे आरोप सरळसरळ असत्य आहेत. हे आरोप म्हणजे कराड दक्षिणेत झालेल्या मतचोरीचा घोटाळा झाकण्यासाठी भाजपने रचलेली केवळ खोटी कथा आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते इंद्रजीत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. चव्हाण म्हणाले, “मी आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांनी एकाच ठिकाणी मतदान केले आहे. भाजपकडून केलेले आरोप हे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

BMC Elections : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचा थेट मराठी मतांवर फोकस

मुंबई – आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने आता मराठी मतदारांवर लक्ष केंद्रित केले असून, निवडणुकीच्या रणशिंगाची चाहूल लागताच पक्षाने आपल्या प्रचाराचा ‘अस्सल मराठी अवतार’ सादर करण्याची तयारी सुरू केली आहे. राज्य सरकारने यंदा गणेशोत्सवाला दिलेला ‘राज्य महोत्सव’ दर्जा भाजपसाठी महत्त्वाचे राजकीय हत्यार ठरणार आहे. याच्या निमित्ताने मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपर्यंत थेट पोहोचण्याचा पक्षाचा डाव […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

दिल्लीतील बैठकीत नाविकांच्या मागण्यांची जहाजमंत्र्यांनी घेतली दखल; सर्वानंद सोनवाल यांची सकारात्मक भूमिका

मुंबई : भारतीय जहाज उद्योगाच्या विकासात आणि संबंधित धोरणात्मक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नॅशनल शिपिंग बोर्डची बैठक 20 ऑगस्ट 2025 रोजी नवी दिल्ली येथे जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थान केंद्रीय नौकानयन मंत्री सर्वानंद सोनवाल यांनी भूषवले. बैठकीदरम्यान नॅशनल युनियन ऑफ सीफेरर्स ऑफ इंडियाचे सरचिटणीस व नॅशनल शिपिंग बोर्डाचे सक्रिय […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

२५ ऑगस्टला अजित पवार घडवणार कोल्हापुरात मोठा राजकीय स्फोट…?

मुंबई: राज्यातील भाजपप्रणीत महायुती सरकारमधील शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशाचा जोरदार सिलसिला सुरू केला आहे. मग राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार हे कसे मागे राहतील? आता त्यांनी कोल्हापूरवर लक्ष केंद्रित केले असून, तेथे २५ ऑगस्ट रोजी एक मोठा राजकीय भूकंप घडविण्याची तयारी सुरू असल्याची […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Women’s commission: महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा पुढाकार – मुंबईत दोन दिवसीय ‘शक्ती संवाद’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन | सर्व राज्यांतील महिला आयोगांचा सहभाग मुंबई : महिला सक्षमीकरण आणि प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग व महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत दोन दिवसीय ‘शक्ती संवाद’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हॉटेल ट्रायडेंट येथे होणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

समृद्धी’च्या धर्तीवर नांदेड–जालना मार्ग मोबदला पर्यायाचा विचार – मात्र Rs 12,000 कोटींच्या कनेक्टर घोटाळ्याने वाढले संशयाचे ढग

मुंबई: नागपूर–मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नांदेड-जालना द्रुतगती मार्गासाठीही जमीन संपादनाचा मोबदला ठरवण्याच्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हा महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला. या बैठकीला वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आमदार अर्जुन खोतकर, नारायण कुचे, कैलास गौरंट्याल यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनिक अधिकारी दूरदृश्य […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Bawankule: शेत-पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी शासनाचा अभ्यासगट

मुंबई : शेतकऱ्यांच्या शेतमाल वाहतुकीला सुलभता आणण्यासाठी आणि शेतीतील यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने शेत-पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणाचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने यासाठी विशेष अभ्यासगट स्थापन केला असून महसूल व वन विभागाने त्याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. या अभ्यासगटाचे नेतृत्व अपर मुख्य सचिव (महसूल) करतील. त्यात जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Congress : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची तातडीची मदत द्या, काँग्रेसची मागणी

मुंबई – मागील तीन-चार दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान (loss of crop due to heavy rain) झाले आहे. शेतात पाणी शिरल्याने उभी पिके वाहून गेली आहेत, तर अनेक ठिकाणी संपूर्ण शेती उद्ध्वस्त झाली आहे. राज्यभरात जवळपास १५ लाख एकरांवरील शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर, […]