राष्ट्रीय ताज्या बातम्या

Kisan Morcha : प्राकृतिक आपत्ती, भ्रष्टाचार आणि कॉर्पोरेट कब्जाविरोधात संयुक्त किसान मोर्चाची आक्रमक भूमिका; 26 नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलनाची हाक

नवी दिल्ली: संयुक्त किसान मोर्चाने देशातील अलीकडच्या अभूतपूर्व नैसर्गिक आपत्तींसाठी कॉर्पोरेट कब्जा, जंगलतोड, भ्रष्टाचार आणि नौकरशाहीच्या मिलीभगतीला जबाबदार धरत सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक चौकशीची मागणी केली आहे. चंदीगड येथे 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या निवेदनात मोर्चाने म्हटले आहे की, संवेदनशील हिमालयीन पट्ट्यातील मेगा प्रकल्प, जंगलांची अंधाधुंध तोड आणि […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ – राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई – राज्यातील अनेक भागांवर पडलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण अडथळ्यात येऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

AAP on Package : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याच्या तोंडाला पुन्हा पाणी पुसले – मुकुंद किर्दत, प्रवक्ते, आम आदमी पार्टी

मुंबई : “राज्य सरकारने जाहीर केलेल्या अतिवृष्टीग्रस्त पॅकेजमधून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहे,” असा आरोप आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “महाराष्ट्राने पंजाबपेक्षा अधिक नुकसानभरपाई दिली” असा दावा केला होता. मात्र हा दावा सपशेल खोटा असल्याचे किर्दत यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते, “महाराष्ट्रात कोरडवाहू […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचे 31,628 कोटी रुपयांचे पॅकेज – मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना दिलासा; शिंदे–पवार यांचीही दिलासादायी भूमिका मुंबई: राज्यातील अतिवृष्टीमुळे 29 जिल्हे, 253 तालुके आणि 2,059 मंडलांतील शेतकरी पूरग्रस्त झाले आहेत. या बळिराजाला पुन्हा उभारी देण्यासाठी राज्य सरकारने 31,628 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मंत्रालयात संयुक्त पत्रकार परिषदेत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Kisan Sabha : अतिवृष्टीग्रस्त मदत पॅकेजमध्ये ‘मोठी चालाखी’ — किसान सभेचा आरोप

31,628 कोटींपैकी केवळ 6,500 कोटी नवे पॅकेज; कर्जमाफी आणि शेतमजुरांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष मुंबई: राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या 31,628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजमध्ये केवळ 6,500 कोटी रुपयांचीच नवी तरतूद असल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेने केला आहे. उर्वरित रक्कम ही यापूर्वी जाहीर झालेल्या योजनांची बेरीज असून, राज्य सरकारने आकडे फुगवून दिशाभूल केल्याचा गंभीर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

NCC : शालेय स्तरावर एनसीसी प्रशिक्षणाची अंमलबजावणी करावी – क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, तंदुरुस्ती आणि नेतृत्वगुण विकसित व्हावेत, यासाठी शालेय स्तरावर एनसीसीचे प्रशिक्षण सुरू करण्यात यावे, असे निर्देश क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत. आज मंत्रालयात आयोजित राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), स्काऊट आणि गाईड संदर्भातील बैठकीत त्यांनी ही भूमिका मांडली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भूसे यांनी शालेय स्तरावर एनसीसी प्रशिक्षण सुरू […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Pratap Sarnaik : एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती

मुंबई : राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कामगारांच्या विविध मागण्या योग्य असून, शासन या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहे. या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे ठोस आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी मंत्रालयात एसटी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

TET विरोधात शिक्षक संघटना आक्रमक – भांडुपमधील सभेत पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्धार

By Niket Pawaskar सिंधुदुर्ग (तळेरे) : सर्वोच्च न्यायालयाच्या सप्टेंबर २०२५ मधील निर्णयानुसार इयत्ता १ ते ८ साठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक नेते आणि सिंधुदुर्गचे सुपुत्र डॉ. विशाल कडणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहर शिक्षक विकास मंडळातर्फे शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षक प्रतिनिधींची बैठक भांडुपमध्ये आयोजित करण्यात आली. या बैठकीत निर्णयावर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Shiv Sena : शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निर्णयाची शक्यता

मुंबई : शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटातील धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरील वादावर उद्या (बुधवार, ८ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर पक्षाचे बहुसंख्य लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरून उद्धव ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये तीव्र संघर्ष सुरू झाला. हा वाद अखेरीस […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेचा तीव्र निषेध

मुंबई – भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर सोमवारी (६ ऑक्टोबर) वकील राकेश किशोर यांनी केलेल्या शारीरिक हल्ल्याने संपूर्ण न्यायव्यवस्था आणि देशातील न्यायवृंद हादरला आहे. या अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह घटनेचा महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेने मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत तीव्र निषेध व्यक्त करत तीन महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश असलेला ठराव एकमताने मंजूर केला. संघटनेने स्पष्ट केले की, हा […]