महाराष्ट्र ताज्या बातम्या

JNU: दिल्लीतील जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; युद्धनीतीवर अभ्यासक्रम लवकरच

मुंबई : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) च्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, महाराजांच्या युद्धनीतीवर आधारित अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. ‘बाळासाहेब भवन’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले की, मराठी भाषेला राजकारणापेक्षा कृतीने सातासमुद्रापार नेण्याचा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Gaza massacre: गाझा नरसंहाराविरोधात निषेधास परवानगी नाकारली; न्यायालयाच्या निरीक्षणावर माकपचा संतप्त निषेध

मुंबई – मुंबई पोलिसांनी गाझामधील इस्रायली कारवाईविरोधात निषेध सभा घेण्यास परवानगी नाकारल्यानंतर, त्याविरोधात भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)ने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. मात्र, या निर्णयादरम्यान न्यायालयाने व्यक्त केलेल्या निरीक्षणांवर माकपने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यास “संविधानविरोधी आणि राजकीय पूर्वग्रहदूषित” म्हटले आहे. पक्षाच्या पोलिट ब्युरोने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “न्यायालयाने पक्षाच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Cabinet Reshuffle: राज्यात लवकरच मंत्रिमंडळात मोठा खांदेपालट?

मुंबई: राज्यातील महायुती सरकारमधील काही मंत्र्यांचे सततचे वादग्रस्त वर्तन, घोटाळे आणि अपयशी कारभार यामुळे सरकारची प्रतिमा मलीन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात लवकरच मोठ्या प्रमाणावर मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अचानक झालेला दिल्ली दौरा या चर्चा अधिकच गडद करत आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Suspended: न्याय न देता निलंबन म्हणजे कारभाराचा गोंधळ! – राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा संतप्त आरोप

मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात १६ हून अधिक वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई तर २५ हून अधिक प्रकरणांवर चौकशीचे आदेश देण्यात आले. या तडकाफडकी कारवायांवर तीव्र नाराजी व्यक्त करत “न्याय न देता निलंबन म्हणजे कारभाराचा गोंधळ” असल्याची तीव्र प्रतिक्रिया राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने आज व्यक्त केली. महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई आणि समीर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कराड पालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणात तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारेंना अटक

कराड – कराड नगरपालिकेच्या बांधकाम परवानगीसंदर्भातील भ्रष्टाचार प्रकरणात तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सोमवार पेठेतील एका अपार्टमेंटच्या सुधारित बांधकाम परवानगीसाठी खंदारे व इतरांनी मिळकतीच्या बाजारभावाच्या १२ टक्के म्हणजेच ₹१० लाख लाचेची मागणी केली होती. यापैकी ₹५ लाखाचा पहिला हप्ता स्वीकारताना […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Dhananjay Munde : मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय — धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कृषी साहित्य खरेदी प्रक्रिया वैध; खोटी याचिका दाखल करणाऱ्यास ₹1 लाख दंड

मुंबई – तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात राबवलेल्या कृषी साहित्य खरेदी प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवत शासनाच्या धोरणात्मक निर्णयास दुजोरा दिला आहे. यासंदर्भातील दोन्ही याचिका फेटाळण्यात आल्या असून, खोटी याचिका दाखल करणाऱ्या तुषार पडगिलवार यांना न्यायालयाने ₹1 लाख रुपयांचा दंड सुनावला आहे. न्यायमूर्ती आलोक आराधे आणि संदीप व्ही. मर्णे यांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Pratap Sarnaik : एस.टी.च्या एकेरी गट आरक्षणावरील ३०% भाडेवाढ रद्द – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई – यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा देत परिवहन मंत्री आणि एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एकेरी गट आरक्षणावर लावण्यात आलेली ३० टक्के भाडेवाढ रद्द करण्याची घोषणा गुरुवारी केली. हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार व मुंबईतील चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. सरनाईक म्हणाले, “गणपती उत्सव, मुंबईचे चाकरमानी आणि […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Chandrakant Dada Patil : राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन करण्याचा निर्णय – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

मुंबई – राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागांतील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता, पारदर्शकता आणि योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस उच्च व तंत्र […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Chandrashekhar Bawankule : आता सर्पमित्रांनाही ओळखपत्रासह १० लाखांचा अपघात विमा – महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा

मुंबई – ग्रामीण भागात वन्यजीव व मानव संघर्ष टाळण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्पमित्रांना लवकरच अधिकृत ओळखपत्र आणि १० लाख रुपयांचा अपघात विमा मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केली. सर्पमित्रांना ‘अत्यावश्यक सेवा’ व ‘फ्रंटलाइन वर्कर’ म्हणून घोषित करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस केली जाणार आहे, असेही […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Swabhimani :स्वाभिमानीचे २० जिल्हाध्यक्ष नाहीत – उदय सामंतांची पोस्ट दिशाभूल करणारी: अनिल पवार यांचा खुलासा

सातारा – राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे २० जिल्हाध्यक्ष शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा सोशल मीडियावर केला असला, तरी हा दावा फोल असून दिशाभूल करणारा आहे, असा स्पष्ट खुलासा स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी केला आहे. पवार म्हणाले की, सामंत यांच्या बैठकीला उपस्थित असलेल्यांपैकी केवळ गजानन बंगाळे आणि रविंद्र […]