मोठ्या गणेश मूर्तींच्या समुद्रात विसर्जनाचा मार्ग मोकळा; राज्य सरकारची पर्यावरणपूरक भूमिका
मुंबई: राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तींचे विसर्जन आता परंपरेप्रमाणे समुद्रातच करण्यात येईल, तर घरगुती व मर्यादित उंचीच्या मूर्तींसाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था कायम राहणार आहे, असे स्पष्ट करत राज्य सरकारने आज मुंबई उच्च न्यायालयात आपले प्रतिज्ञापत्र सादर केले. यामुळे मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनास पुन्हा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप […]