जनसुरक्षा विधेयकावर लढ्याचा बिगुल; १४ ऑगस्टला ठाकरे-पवार एकाच मंचावर
मुंबई : महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ हा कायदा लोकशाहीला बाधा आणणारा आणि नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणारा आहे—असा जाहीर हल्लाबोल करत, विरोधकांनी आता निर्णायक लढ्याची हाक दिली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, १४ ऑगस्ट रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘निर्धार परिषद’ भरवली जाणार असून, यामध्ये राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा होणार आहे. राजकारणातील दिग्गज आणि जनआंदोलनातील नामवंत नेते […]