महाराष्ट्र ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : क्रिएटर्स इकॉनॉमी केंद्रासाठी कुशल मनुष्यबळ विकासाचे उद्दिष्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एमएफएससीडीसी आणि एफटीआयआय दरम्यान सामंजस्य करार मुंबई : सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) यांच्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने ‘क्रिएटर्स इकॉनॉमी’च्या विकासासाठी कुशल मनुष्यबळ विकासाचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. ही केवळ सहकार्याची सुरुवात आहे. येत्या काळात महाराष्ट्र हे देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

लातूर घटनेनंतर अजित पवार यांची कठोर कारवाई; सूरज चव्हाणचा राजीनामा, पण कोकाटेंचा काय?

मुंबई : लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या झटापटीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत तातडीने कारवाई केली. “लातूरमध्ये काल घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session: महसूल राज्यमंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार – अनिल परब यांचा विधान परिषदेत खळबळजनक आरोप; तात्काळ राजीनाम्याची मागणी

मुंबई : राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याच आईच्या नावावर डान्सबार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते व आमदार अनिल परब यांनी आज विधान परिषदेत केला. त्यांनी सरकारकडे गृहराज्यमंत्री कदम यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी केली. परब म्हणाले, “कांदिवलीत मे महिन्यात पोलिसांनी ‘सावली बार’वर छापा टाकला. २२ बारबालां, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session : सत्तेच्या लालसेपायी महाराष्ट्रावर काळीमा; हिंदी सक्ती होऊ देणार नाही – उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल

By: संतोष पाटील मुंबई:“भाषेचा द्वेष नाही, पण हिंदी सक्ती कधीही होऊ देणार नाही. आधी मुख्यमंत्री यांनी नीट मराठी शिकावी, मराठी वाचायला शिकावे,” अशा कठोर शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सरकारवर निशाणा साधला. विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “सत्तेच्या लालसेपायी महाराष्ट्रावर काळीमा फासला गेला आहे. विधानभवनात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाचा समारोप; 17 विधेयकांना मंजुरी, राज्याच्या पुढील वाटचालीस दिशा – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने विकासाला गती देणारी 17 विधेयके मंजूर केली असून, जनहिताचे अनेक निर्णय घेण्यात आले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. अधिवेशनात विशेष जनसुरक्षा विधेयक, अनुसूचित जाती-जमाती आयोगांना वैधानिक दर्जा, त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, झोपडपट्टी पुनर्विकास सुधारणा, मकोका कायद्यात बदल, खनिकर्म प्राधिकरण असे अनेक महत्त्वाचे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session: माझ्या वाटेला जाऊ नका, नाहीतर सोडणार नाही!” – उपमुख्यमंत्री शिंदे यांचा उबाठा गटाला इशारा

मुंबई : “मी कोणाला छेडत नाही, पण मला छेडलं तर कोणाला सोडत नाही,” असा निर्वाणीचा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत उबाठा गटाला दिला. शिंदे म्हणाले, “मराठी माणूस, मराठी भाषा आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व आमचा प्राण. पण तुमचं ‘म’ म्हणजे महापालिकेचा, मलिदा, मतलब आणि मतांचा आहे.” त्यांनी आरोप केला की, जनतेच्या मतांची […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session : शिक्षक भरती घोटाळ्यावरून पडळकर-भुसे यांच्यात विधानपरिषदेत वाकयुद्ध; अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गहजब

मुंबई : विधानभवनातील हाणामारी प्रकरणामुळे चर्चेत आलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानपरिषदेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर हल्लाबोल करत सभागृहात खळबळ उडवली. राज्यातील सरळसेवा शिक्षक भरतीमधील बिंदूनामावली घोटाळ्यावर लक्षवेधी सूचना मांडताना पडळकरांनी शिक्षण विभागातील भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “१९६९ पासून बिंदूनामावली सुरु झाली. त्यानंतर अनेक बदल झाले. लाखोंच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session : राड्यानंतर विधानभवनात अभूतपूर्व बंदोबस्त; सर्व पास रद्द, विशेष परवानगीशिवाय प्रवेश बंद

मुंबई : विधानभवन परिसरात काल घडलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आज पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानभवनात अभूतपूर्व सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विधानभवन सुरक्षा कार्यालयाने सर्व प्रकारचे प्रवेश पास तातडीने रद्द केल्याचे आदेश जारी केले गेले. या निर्णयानुसार कोणत्याही शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्यांना देखील प्रवेश दिला गेला नाही. फक्त विशेष परवानगी पत्र असणाऱ्यांनाच प्रवेश दिला जात […]

मुंबई

Monsoon Session : माझ्या पी.ए.ला सन्मानाने सोडा, अन्यथा हलणार नाही! – अमोल मिटकरींचं विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन

मुंबई: विधानभवनाबाहेर शुक्रवारी सकाळपासूनच नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत सुरक्षेच्या नियमांना आव्हान दिलं. मिटकरी यांच्या वैयक्तिक सहाय्यकाला (पी.ए.) विधानभवनात प्रवेश नाकारण्यात आला, यामुळे संतप्त झालेल्या मिटकरी यांनी प्रवेशद्वारावरच आंदोलन सुरू केले. त्यांनी ठामपणे जाहीर केलं, “जोपर्यंत माझ्या पी.ए.ला आणि […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session: विधानभवन हाणामारी प्रकरणात गोपीचंद पडळकर यांची पत्रकार परिषदेत दिलगिरी; “आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत”

मुंबई : विधानभवनाच्या तळमजल्यावर गुरुवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांशी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांत झालेल्या हाणामारी प्रकरणावर आज पडळकर यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी केलेल्या चुकीसाठी दिलगिरी व्यक्त केली आणि “आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे जी कारवाई होईल, त्याला न्यायालयात सामोरे […]