महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session: सांगलीच्या इस्लामपूरचे ‘ईश्वरपूर’ म्हणून नामांतर; राज्य सरकारची मान्यता, प्रस्ताव केंद्राकडे

मुंबई : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर गावाचे ‘ईश्वरपूर’ असे नामकरण करण्याच्या मागणीला अखेर मंजुरी मिळाली आहे. राज्य सरकारने याला मान्यता दिल्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत केली. भुजबळ म्हणाले, “इस्लामपूर गावाचे ‘ईश्वरपूर’ असे नामांतर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. हा विषय केंद्राच्या अखत्यारीत येत असल्याने राज्य सरकारने केंद्राला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session: ऑनलाईन गेमिंगमुळे युवक कर्जबाजारी; केंद्राने कायदा करावा, राज्य सरकारकडून पाठपुरावा – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : ऑनलाईन गेमिंगमुळे राज्यातील युवक मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणीत सापडत असून त्यातून गुन्हेगारीकडे व नैराश्याकडे झुकत आहेत. या समस्येवर राज्य सरकार स्वतंत्र कायदा करू शकत नाही, त्यामुळे केंद्र सरकारनेच यावर प्रभावी कायदा करावा यासाठी पत्र पाठवले असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लक्षवेधीला उत्तर दिले. धाराशीवचे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session: विधानभवनातील मारामारी प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची तीव्र नापसंती; “सर्वांच्या प्रतिष्ठेला धक्का”

मुंबई : विधानभवनात गुरुवारी घडलेल्या मारामारीच्या घटनेवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “या घटनेमुळे कुणा एकट्याची प्रतिष्ठा गेली असे नाही, तर सभागृहात बसलेल्या प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मलिन झाली आहे. आज बाहेर ज्या शिव्याशापात बोलले जात आहे, ते केवळ गोपीचंद पडळकर किंवा जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांवर नाहीत, तर ‘हे आमदार माजले […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session: विधानभवनातील हाणामारी प्रकरणावर कारवाई; दोन अभ्यागतांवर विशेषाधिकार भंगाची कारवाई, सदस्यांनी व्यक्त करावा खेद – अध्यक्ष राहुल नार्वेकर

मुंबई : विधानभवन परिसरात गुरुवारी झालेल्या हाणामारीच्या घटनेची गंभीर दखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात घेतली. जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यासमवेत आलेले अभ्यागत – नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांच्यावर विशेषाधिकार भंग (हक्कभंग) कारवाई होणार असून, या प्रकरणात फौजदारी कारवाईही करण्यात येत असल्याची माहिती अध्यक्षांनी दिली. हे प्रकरण विधानसभा विशेषाधिकार समितीकडे सुपूर्द […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session: गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा; आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी राज्य सरकारचा विशेष उपक्रम

मुंबई : गणेशोत्सवाला यंदापासून राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, महाराष्ट्र सरकार अधिकृत सहभाग घेईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. गणेशोत्सवाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “महाराष्ट्र ही कला, संस्कृती, परंपरा, संत-सुधारक आणि भक्ती-आध्यात्म यांची समृद्ध भूमी आहे. गणेशोत्सवाने […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Devendra Fadnavis: अहिल्यानगरच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय: सात नवीन पोलीस ठाणी, ५५० नवीन पदांची भरती – मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

मुंबई – अहिल्यानगर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात सात नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती केली जाणार असून त्यापैकी एक पोलीस ठाणे मंजूर झाले आहे, तर उर्वरित सहा पोलीस ठाण्यांसाठी मंजुरी प्रक्रियेत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विक्रम पाचपुते यांनी विधानसभा नियम क्रमांक १०५ नुसार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Raj Thackeray: विधानभवनात हातघाई: महाराष्ट्राची अधोगती की राजकीय नौटंकी? – राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

मुंबई : विधानभवनाच्या आवारात काल सत्ताधारी पक्षाचे आमदार समर्थक आणि विरोधकांच्या कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी झाली. या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज थेट सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. “ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडतोय – काय अवस्था झाली आहे आपल्या महाराष्ट्राची?” असा सवाल करत राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांची खिल्ली उडवली आहे. “सत्ता […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

South Korea : दक्षिण आशियातील राजकीय ध्रुवीकरणावर प्रा सुनील नेवे यांचा जागतिक मंचावर शोधनिबंध सादर

जळगाव: सेऊल, दक्षिण कोरिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र परिषदेत भालोद येथील सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी सहभाग घेतला. “दक्षिण आशियातील राजकीय ध्रुवीकरण : सध्याच्या परिस्थितीत भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशचे तुलनात्मक विश्लेषण” या विषयावर त्यांनी आपला शोधनिबंध सादर केला. या परिषदेत विविध देशांतील तज्ज्ञांनी प्रा. […]

mbmc महाराष्ट्र ताज्या बातम्या

Swatchhta Abhiyan: स्वच्छ सर्वेक्षण अभियानात मिरा – भाईंदर मनपा देशात प्रथम

राज्याला दहा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान नवी दिल्ली : स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024-25’ मध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशात आपले वर्चस्व सिद्ध केले असून राज्याला एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यंदाच्या सर्वेक्षणात मिरा भाईंदर महानगरपालिकेने देशात सर्वप्रथम क्रमांक पटकावत राज्याचा नावलौकिक वाढविला आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

महाराष्ट्रासाठी पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची मांडणी : राज्यमंत्री इंद्रनील नाईक

नवी दिल्ली: महाराष्ट्र राज्य हे ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यासाठी पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची आवश्यकता असल्याची धोरणात्मक मांडणी ऊर्जा परिषदेत केली असल्याची माहिती राज्याचे उद्योग राज्यमंत्री इंद्रजीत नाईक यांनी आज येथे दिली. महाराष्ट्राने हरित ऊर्जा क्षेत्रात आपली दृढ भूमिका अधोरेखित केली असून 2030 पर्यंत ऊर्जा उत्पादनात स्वयंपूर्णतेचा मार्ग महाराष्ट्र निश्चितपणे स्वीकारेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. […]