महाराष्ट्र ताज्या बातम्या

आणि कासवाने पुन्हा शर्यंत जिंकली…

पनवेल : ससा आणि कासव यांच्या शर्यतींची गोष्ट आपणा सर्वांनाच माहिती आहे. अशीच एक महत्वाची म्हणजे जीवन मरणाची शर्यंत आज कासवाने पुन्हा जिंकली असून कासव पुन्हा वडाळे तलावात आपल्या मुक्कामी सुखरूप पोहचले. वडाळे तलाव परिसरात एका कासवाच्या तोंडात गळ अडकल्याची माहिती मुकुंद कोळी यांनी अग्निशमन केंद्राला दिली. अग्निशमन विभागाचे वाहन घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचल्यावर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

दीड लाख गोविंदांना विमा कवच देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील दीड लाख गोविंदांना विमा कवच देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रिडा विभागाला दिले आहेत. आज दहीहंडी समन्वय समितीने मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी केली. महाराष्ट्र शासनाने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिल्यापासून या खेळात गोविंदांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे गोविंदांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विमा कवचाची […]

ajit pawar महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक पदांची पुढील पदोन्नती भरती शंभर टक्के जवानांमधूनच – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

मुंबई: राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक (गट-क) पदासाठी येणारी पदोन्नती प्रक्रिया शंभर टक्के जवान संवर्गामधूनच करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. सध्या उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक पदांवर २५ टक्के थेट पदोन्नती, २५ टक्के मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि ५० टक्के नामनिर्देशन याद्वारे भरती केली जाते. यामध्ये विभागीय परीक्षेत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

NCERT च्या पुस्तकातून इतिहासाचे विकृतीकरण; भाजपाच्या संघटनेचा द्वेषमूलक अजेंडा राबवला जात असल्याचा सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई : एनसीईआरटीच्या इयत्ता आठवीच्या इतिहास पुस्तकात करण्यात आलेल्या बदलांवरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. मुघल शासकांचे एकतर्फी, नकारात्मक चित्रण करून भाजप आणि संघाच्या विचारसरणीला पूरक अशी विषारी मानसिकता विद्यार्थ्यांच्या मनात तयार केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. “विद्यार्थ्यांनी इतिहास समतोल दृष्टिकोनातून न पाहता हिंदू आणि मुस्लिम […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कल्याण चिकणघर पुनर्विकासाचा मुद्दा विधानपरिषदेत गाजला; मंत्र्यांकडून महिन्याभरात बैठक घेण्याचे आश्वासन

मुंबई: “कल्याण पश्चिमेतील मौजे चिकणघर येथील शांतिदूत सोसायटीच्या रखडलेल्या पुनर्विकासाचा प्रश्न विधान परिषदेत लक्षवेधीव्दारे उपस्थित करण्यात आला. विधान परिषद सदस्य योगेश टिळेकर यांनी हा मुद्दा उचलून धरत राज्य शासनाचे त्याकडे लक्ष वेधले. कल्याण पश्चिमेतील चिकणघर येथील हा प्रकल्प टायकून्स अवंती प्रोजेक्ट एलएलपी विकासकाने हाती घेतला असून गेल्या १३ वर्षांपासून तो अर्धवट स्थितीत असल्याने त्यातील १८४ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Jan Suraksha Bill : संघर्ष समितीने राज्यपालांची घेतली भेट, विधेयकाला मंजुरी न देण्याची मागणी

मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या जनसुरक्षा विधेयकाला (बिल क्रमांक ३३, २०२४) राज्यपालांनी मंजुरी देऊ नये, अशी मागणी “जनसुरक्षा विधेयकविरोधी संघर्ष समिती”ने आज राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली. विविध डावे प्रगतीशील पक्ष, शेतकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना निवेदन सादर करून या विधेयकातील जाचक तरतुदींवर सविस्तर चर्चा केली. संघर्ष समितीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI), मार्क्सवादी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session : महाविकास आघाडीचा हल्लाबोल; ‘चड्डी बनियन गँग’ विरोधात विधानभवनात जोरदार घोषणाबाजी

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. “पन्नास खोके, एकदम ओके”, “चड्डी बनियन गँग हाय हाय”, “महाराष्ट्राला लुटणाऱ्यांचा धिक्कार असो”, अशा घोषणा देत मविआ आमदारांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. दानवे म्हणाले, “राज्यात सध्या लुटारू आणि दरोडेखोर ‘चड्डी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session : सत्ताधाऱ्यांकडून सभागृहात असंतोष; ‘आम्हालाही मतदारसंघात उत्तर द्यावं लागतं’ – बावनकुळे

मुंबई : विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आज जोरदार गदारोळ झाला. सत्तारूढ भाजप सदस्यांनी “आम्हालाही बोलायची संधी मिळत नाही” असा आक्षेप घेत अध्यक्षांच्या आसनासमोर धाव घेतली. दोनतासांच्या कामकाजात जवळजवळ दीड तास औचित्याच्या मुद्द्यांसाठी दिला गेला. मात्र, हात वर करूनही सत्ताधारी सदस्यांना बोलण्याची संधी दिली जात नाही, यावरून अस्वस्थता निर्माण झाली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session : गायी-गोवंश हत्या रोखण्यासाठी प्राणी रक्षण कायद्यात सुधारणा करा – संजय केळकर यांची विधानसभेत मागणी

मुंबई : राज्यात गायी आणि गोवंश हत्या तसेच त्यांची अवैध विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी प्राणी रक्षण अधिनियमात तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावरून केली. राज्याच्या विविध भागांमध्ये प्राण्यांच्या अवैध कत्तली वाढत आहेत. तसेच हत्येसाठी गोवंशांची राज्याबाहेर ने-आण होते. काही ठिकाणी पोलिसांनी तस्करी करताना जनावरे पकडल्यानंतर परस्परच त्यांची […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session : झुडपी जंगल हस्तांतरणाचा निर्णय; ‘गरिबांना बेघर करणार नाही’ – महसूलमंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई : विदर्भातील सहा जिल्ह्यांतील झुडपी जंगलं वनक्षेत्र घोषित करून ती जमीन वनविभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय जरी घेतला असला, तरी शासन कोणत्याही गरिबाला बेघर होऊ देणार नाही, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली. ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा नियम १०५ अन्वये लक्षवेधी सूचना मांडली होती. जून २०२५ मध्ये महसूल विभागाकडून […]